Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच 150 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहेत.
Mukesh Ambani
Mukesh Ambani Dainik Gomantak

Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच 150 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेत एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. तज्ञांच्या मते, दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात क्रांती केल्यानंतर, मुकेश अंबानी डायग्नोस्टिक हेल्थकेअर सेगमेंटमध्ये आपला हात आजमावणार आहेत. या सेगमेंटचे नेतृत्व रिलायन्स रिटेल व्हेंचर्सशिवाय कोणीही करणार नाही. कंपनीने यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींची रिलायन्स रिटेल व्हेंचर्स डायग्नोस्टिक सेवा कंपनीमध्ये 1,000 ते 3,000 कोटी रुपयांचे बहुसंख्य स्टेक खरेदी करण्याचा विचार करत आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच ऑनलाइन फार्मसी नेटमेड्सचा समावेश केला आहे. ही कंपनी पॅथॉलॉजी सर्व्हिस प्रोवाइड करते. कंपनीने यासाठी थायरोकेअरसारख्या अनेक कंपन्यांशी करारही केले आहेत.

Mukesh Ambani
Mukesh Ambani बनले जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO; एलन मस्क आणि सुंदर पिचाई यांना सोडले मागे

मुकेश अंबानींचा ‘हा’ प्लॅन आहे

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल स्वतःची डायग्नोस्टिक कंपनी स्थापन करण्याचा विचार करत आहे. या डायग्नोस्टिक कंपनीचे नेटवर्क संपूर्ण देशात असण्याची कंपनीची योजना आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स अनेक पर्यायांवर काम करत आहे. मिडियम टर्मवर करार होऊ शकतो, अशीही बातमी आहे. मात्र यावर रिलायन्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रिलायन्स रिटेलने 2020 मध्ये Netmeds मधील बहुतांश भागभांडवल विकत घेतले होते. रिलायन्सने हा करार 620 कोटी रुपयांत केला होता. कंपनीने दीड वर्षांपूर्वी जानेवारीमध्ये पहिले ऑफलाइन स्टोअर उघडले होते. सध्या देशभरात 1000 हून अधिक स्टोअर्स आहेत. सध्या रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता.

Mukesh Ambani
Mukesh Ambani Threatened: उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल; "आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर"

दरम्यान, हा व्यवसाय 150 अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. एमके रिसर्चच्या नोंदीनुसार, या सेगमेंटमधील आघाडीच्या चार कंपन्यांचा हिस्सा केवळ 6 टक्के आहे. बाकीच्यांना रीजनल प्लेयर्सकडून धोका आहे. गेल्या 3 वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, या क्षेत्रात अनेक मोठे अधिग्रहण पाहिले गेले आहेत. कोरोना काळात डॉ. लाल पॅथ लॅबने सब अर्बन डायग्नोस्टिकचा वाटा उचलला होता. PharmEasy ने थायरोकेअरमध्ये मोठे भागभांडवल विकत घेतले होते. ज्याची किंमत 4,546 कोटी रुपये होते. मेट्रोपोलिसने 636 कोटी रुपयांना हाय-टेक डायग्नोस्टिक सेंटर देखील अधिग्रहित केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com