Manish Jadhav
शेअर बाजारातील तेजीचा मंगळवारी (8 जानेवारी) देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना जबरदस्त फायदा झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी एकाच दिवसात $1.70 अब्ज म्हणजेच 14,600 कोटी रुपयांची वाढ झाली.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता $92.2 अब्ज झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत 1.58 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
मुकेश अंबानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 17 व्या स्थानी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मंगळवारी बीएसईवर 22.70 रुपयांनी वाढून 1240.90 रुपयांवर बंद झाले.
अंबानींसोबतच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही मंगळवारी लक्षणीय वाढ झाली.
गौतम अदानी यांची संपत्ती एका दिवसात 1.50 अब्ज डॉलर म्हणजेच 12,900 कोटी रुपयांनी वाढली. यासह, अदानी यांची एकूण संपत्ती $76 अब्ज झाली आहे.
अदानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 19व्या स्थानी आहेत.