oil Dainik Gomantak
अर्थविश्व

रशियन तेलाचा फायदा भारताला होणार; RBI ने वाढवली सरासरी किंमत

RBI ने आज तेलाची सरासरी किंमत $105 पर्यंत वाढवली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाला (Russia) कमकुवत करण्यासाठी युरोपियन युनियनच्या देशांनी रशियन तेलावर नवीन प्रतिबंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रशिया स्वस्त दरांमध्ये तेल विकत आहे. भारतीय तेल कंपन्या रशियाकडून स्वस्त दरात अधिक तेल खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने मंगळवारी सांगितले की बाजारभावापेक्षा खूपच कमी असलेल्या रशियन तेलाची सामान्यपेक्षा जास्त आयात केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी कार्यरत भांडवलाची आवश्यकता कमी होऊ शकते. (India will benefit from Russian oil RBI raises average price)

किरकोळ पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (इंडियन ऑईल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने मागील काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किरकोळ विक्री किमतीत बदल करण्यात आलेला नाहीये. तेल विकण्यात त्यांचे नुकसान होत आहे, परंतु रिफायनरी मार्जिन आणि कमी प्रक्रिया शुल्कामुळे याची भरपाई करण्यात येत आहे.

फिचने एका अहवालात म्हटले आहे की वाढती जागतिक मागणी आणि परिष्कृत उत्पादनांसाठी कमी झालेला पुरवठा शुद्धीकरण मार्जिनला समर्थन देतो आणि तेल कंपन्यांच्या विपणन मार्जिनमध्ये हळूहळू सुधारणा करत असतो. या अहवालानुसार, "बाजार किमतींपेक्षा लक्षणीय सवलतीने रशियन तेलाची नेहमीपेक्षा जास्त आयात केल्याने तेल विपणन कंपन्यांसाठी नजीकच्या काळातील कार्यरत भांडवलाची आवश्यकता कमी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे."

मध्यम कालावधीत किमतीत चढ-उतार होतील

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, “मध्यम कालावधीत कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेनुसार भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती राहतील अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे उर्वरित आर्थिक वर्ष 2022-23 साठी OMC च्या मार्केटिंग मार्जिनमध्ये हळूहळू सुधारणा व्हायला हवी, जरी ती सामान्य पातळीपेक्षा कमी असली तरीही.”

कच्चे तेल $119 च्या पातळीवर

कच्च्या तेलाच्या किमती मार्चच्या सुरुवातीला $84 प्रति बॅरलवरून 14 वर्षांच्या उच्चांकावर $139 वर पोहोचला आहे. तसेच नंतर ते हळूहळू काहीसे कमी झाले आणि सध्या ते प्रति बॅरल $119 च्या जवळपास आहेत.

कच्च्या तेलाची सरासरी अंदाजे $105

आज, चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घोषणा करताना, रिझर्व्ह बँकेने कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $105 वर ठेवली आहे. एप्रिलमध्ये झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी कच्च्या तेलाच्या किमतीचा सरासरी अंदाज $100 प्रति बॅरल ठेवला ऐवढा होता. गेल्या आठवड्यात कोटक सिक्युरिटीजने कच्च्या तेलावरील अंदाज सुधारित केला. ब्रोकिंग फर्मने 2022-23 साठी कच्च्या तेलाचा सरासरी अंदाज $90 प्रति बॅरल वरून $105 प्रति बॅरल ऐवढा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT