ग्राहकांना मिळणार अतिरिक्त सुविधा; क्रेडिट कार्ड UPIला जोडण्याचा प्रस्ताव

क्रेडिट कार्ड यूपीआयला जोडण्यास डिजिटल पेमंटची व्याप्ती वाढणार.
RBI
RBI Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल व्यवहारासाठी (Digital Payment) UPI वापरणाऱ्या करोडो लोकांना आज एक चांगली बातमी दिली आहे. आता केवळ बचत खाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डवरूनही UPI द्वारे पेमेंट करणे शक्य होईल. रिझर्व्ह बँक लवकरच ही सुविधा सुरू करणार आहे असल्याचे य़ावेळी सांगण्यात आले आहे. (Additional convenience to customers Proposal to add credit card to UPI)

RBI
चलनविषयक धोरण समितीच्या घोषणेपूर्वी तणाव, शेअर बाजारात घसरण कायम

UPI पेमेंट रुपे कार्डने सुरू होईल

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीच्या RBI MPC जून 2022 बैठकीमध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले की, डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंटची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याची सुरुवात RuPay क्रेडिट कार्डने केली जाणार आहे. नंतर, ही सुविधा मास्टरकार्ड आणि व्हिसासह इतर गेटवेवर आधारित क्रेडिट कार्डसाठी देखील सुरू केली जाऊ शकते असेही यावेळी सांगण्यात आले. जे लोक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डमधून पैसे काढतात किंवा त्यातून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतात त्यांच्यासाठी हे सोपे होणार आहे. या दोन्ही परिस्थितीत लोकांना अतिरिक्त शुल्क आणि कर भरावे लागता होते.

आता ही रक्कम ई-आदेशाद्वारे भरता येणार आहे

यासोबतच रिझर्व्ह बँकेने सबस्क्रिप्शन पेमेंटही सोपे केले. मग ते कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन असो किंवा शाळेची फी भरणे, गॅस बिल असो किंवा मोबाईल-ब्रॉडबँडचे मासिक बिल असो... अशा आवर्ती पेमेंटसाठी रिझर्व्ह बँकेने ई-आदेश (E-Mandate) अनिवार्य केले आहे.

ई-आदेश अनिवार्य केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित केली. आता ही मर्यादा 3 वेळा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अशा व्यवहारांसाठी 5000 रुपयांची मर्यादा होती मात्र आता 15,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार ई-आदेशाद्वारे करता येणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर दास पुढे म्हणाले की, ही दोन्ही पावले डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यावरती केंद्रित आहेत.

RBI
RBI ने रेपो दरात केली वाढ, होम-ऑटो कर्जाच्या EMIमध्येही वाढ

UPI पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे अशा प्रकारे केले जाईल

रिझर्व्ह बँकेच्या या सुविधेमुळे आता क्रेडिट कार्ड स्वाइप न करता पेमेंट करणे शक्य होईल. यासाठी क्रेडिट कार्ड प्रथम UPI शी लिंक करावे लागणार आहे. त्यानंतर, थेट QR कोड स्कॅन करून पेमेंट करणे शक्य होईल. पेमेंट करताना, तुम्हाला कोणत्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट करायचे आहे, हा पर्याय तिथे मिळेल. तुम्ही UPI अॅपवरून पेमेंट सुरू करताच, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. ओटीपी सबमिट केल्यावर तुमचे पेमेंट पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com