India GDP Growth Dainik Gomantak
अर्थविश्व

India GDP Growth: निवडणुकीदरम्यान आनंदाची बातमी; चौथ्या तिमाहीचा GDP एवढ्या टक्क्यांनी वाढला!

India GDP Growth: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

India GDP Growth: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.8 टक्के राहिला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 24 च्या शेवटच्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वेगाने वाढले आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले. भारताचा GDP मार्च तिमाहीत 7.8 टक्क्यांनी वाढला. केंद्राने आता FY24 साठी एकूण ग्रोथ रेट 8.2 टक्के एवढा वर्तवला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार होता. भारताने (RBI) 6.9 टक्क्यांचा अंदाज ओलांडला आहे.

परकीय चलनाचा साठा इतकाच राहिला

दरम्यान, 24 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा $648 अब्ज होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत $2 अब्जची किंचित घट झाली. चौथ्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट 7.8 टक्के असल्याने, FY24 मध्ये GDP वाढीचा दर 8.2 टक्के राहू शकतो, जो भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवतो. चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सर्व अंदाजांपेक्षा चांगला राहिला.

सरकार बदलाचा जीडीपी वाढीवर परिणाम होणार नाही

सांख्यिकी कार्यालयाने असेही म्हटले की, याच कालावधीत अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने वगळून ग्रॉस वॅल्‍यू ॲडेड(GVA) 6.3% वाढले आहे. हे आकडे निवडणुकीपूर्वी मजबूत आर्थिक कामगिरी अधोरेखित करतात. भारतातील सहा आठवडे चाललेल्या निवडणुका 1 जून रोजी संपत असून, 4 जून रोजी निकाल आहेत. निर्मल बँग इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अर्थशास्त्रज्ञ टेरेसा जॉन यांनी सांगितले की, जूनमध्ये कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन केले तरी भारताचा जीडीपी विकास दर मजबूत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT