Indian Economy: गूड न्यूज! तिसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर; RBI ने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त

Indian Economy: आकडेवारीनुसार, हे 2022-23 या आर्थिक वर्षातील 7 टक्क्यांच्या सुधारित आकड्यापेक्षा जास्त आहे.
Indian Economy
Indian EconomyDainik Gomantakn

Indian Economy: देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक आनंदाची बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर 2023) भारताचा विकास दर म्हणजेच GDP 8.4 टक्के नोंदवला गेला आहे. विशेषतः उत्पादन, खाणकाम, उत्खनन आणि बांधकाम क्षेत्राच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, हे 2022-23 या आर्थिक वर्षातील 7 टक्क्यांच्या सुधारित आकड्यापेक्षा जास्त आहे.

सुधारित अंदाज

दरम्यान, NSO ने जानेवारी 2024 च्या आधी जाहीर केलेल्या पहिल्या अॅडव्हान्स अंदाजात चालू आर्थिक वर्षासाठी 7.3 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. NSO ने 2022-23 साठी GDP वाढीचा सुधारित अंदाज 7.2 टक्क्यांवरुन 7 टक्के केला होता. यापूर्वी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 7.8% आणि पुढील तिमाहीत 7.6% दराने वाढली होती. यानंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला पूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा GDP अंदाज 6.5 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांपर्यंत सुधारावा लागला.

Indian Economy
Indian Economy: भारत लवकरच बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार; अर्थ मंत्रालयाचा अंदाज

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतासाठी 6.7 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या तिमाहीत मंद गतीने वाढ होऊनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे. IMF च्या अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्था चीन (4.6%), अमेरिका (2.1%), जपान (0.9%), फ्रान्स (1%), UK (0.6%) आणि जर्मनी (-0.5%) यांसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com