GDP Data Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Economy: अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर आनंदाची बातमी: सप्टेंबर तिमाहीत GDP एवढ्या टक्क्यांनी वाढला!

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.6 टक्के होता, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तो 6.2 टक्के होता. देशाची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) स्थिर दराने 7.7 टक्के दराने वाढली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच सहामाहीत 9.5 टक्के होती. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यासह, भारत हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान आर्थिक विकास दर गाठणारा देश आहे. या जुलै-सप्टेंबर तिमाहीत चीनचा जीडीपी (स्थूल देशांतर्गत उत्पादन) वाढीचा दर 4.9 टक्के राहिला. GDP म्हणजे देशामध्ये ठराविक कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य.

दरम्यान, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (GVA) वाढीचा दर 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 2.5 टक्के होता. उत्पादन क्षेत्रातील GVA वाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 13.9 टक्के होता, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 3.8 टक्क्यांनी घसरला होता. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत जीडीपी वाढीचा दर 7.7 टक्के होता, जो मागील वर्षी याच सहामाहीत 9.5 टक्के होता.

अपेक्षेपेक्षा चांगला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अंदाजानुसार, दुसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्के आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारताची वाढ मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा होती.

वित्तीय तूट लक्ष्याच्या 45% पर्यंत पोहोचली आहे

गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात (FY24) एप्रिल-ऑक्टोबरसाठी भारताची वित्तीय तूट 2023-24 च्या सरकारच्या 17.87 ट्रिलियन रुपयांच्या लक्ष्याच्या 45% पर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीतील तूट 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 45.6% होती. सरकारचा खर्च आणि महसूल यातील तफावतीला 'वित्तीय तूट' म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT