Moody's Rating
Moody's RatingDainik Gomantak

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट, मूडीजने ग्रोथ रेट संदर्भात सांगितली 'ही' गोष्ट

Moody's Rating: जगात एकीकडे रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, तर दुसरीकडे मोठ्या आर्थिक मंदीचं सावट घोंघावत आहे.
Published on

Moody's Rating: जगात एकीकडे रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, तर दुसरीकडे मोठ्या आर्थिक मंदीचं सावट घोंघावत आहे. कोणत्याही देशासाठी मजबूत अर्थव्यवस्था खूप महत्त्वाची असते.

यातच, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर, मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे 'बीएए3' रेटिंग कायम ठेवले आहे.

यासह, मूडीजने पुष्टी केली की, उच्च दराने वाढ होत असूनही, गेल्या 7-10 वर्षांत भारताची संभाव्य वाढ घसरली आहे.

शिवाय, भारतावर (India) कर्जाचा बोजा असल्याचे सूचित केले आहे. यासोबतच, मूडीजने भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले असून विकास दर कायम ठेवला आहे.

स्थिर आउटलुक

मूडीजने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च GDP वाढीमुळे उत्पन्नाची पातळी आणि एकूणच आर्थिक लवचिकता हळूहळू वाढण्यास हातभार लागेल.

Moody's Rating
Indian Economy: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी अपडेट, 2022-23 मध्ये बँकांच्या नफ्यात भरघोस वाढ

आर्थिक प्रगती

याव्यतिरिक्त, आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे, ज्यामुळे आर्थिक आणि आकस्मिक उत्तरदायित्व जोखमींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासावर मोदी सरकारचा भर, भांडवली खर्चात वाढ, यामुळे लॉजिस्टिक कामगिरी आणि व्यापार आणि वाहतूक-संबंधित पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com