1 August 2023 New Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

1 August 2023 New Rules: 1 तारीख खास! इन्कम टॅक्स ते गॅस सिलिंडरपर्यंत बदलणार 'हे' नियम, जाणून घ्या?

Manish Jadhav

1 August 2023 New Rules: उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून नवा महिना सुरु होणार आहे. उद्यापासून देशभरात अनेक बदल होणार आहेत.

बँक ते आयकर रिटर्न आणि एलपीजी सिलिंडरपर्यंत अनेक नवे नियम लागू होणार आहेत. यासोबतच अनेक बँकांच्या एफडीही ऑगस्ट महिन्यात बंद होत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याबद्दलही माहिती असायला हवी.

आयटीआर भरल्यास दंड आकारला जाईल

जर तुम्ही 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स (Income Tax) रिटर्न भरले नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. 31 जुलै ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

1 ऑगस्टपासून आयकर भरणाऱ्यांना 5000 रुपये दंड भरावा लागणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा आयटीआर आजच भरावा. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ITR दाखल करु शकता.

SBI ची ही योजना बंद होणार आहे

SBI च्या वतीने ग्राहकांना अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची संधी दिली जात आहे. तुम्हाला या योजनेत फक्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे.

15 ऑगस्टपर्यंत IDFC च्या योजनेत गुंतवणूक करा

याशिवाय, IDFC बँक 15 ऑगस्ट रोजी आपल्या ग्राहकांसाठी (Customers) उपलब्ध असलेली अमृत महोत्सव एफडी देखील बंद करणार आहे. याचा फायदा तुम्ही 15 ऑगस्टपर्यंतच घेऊ शकता, त्यामुळे शेवटच्या तारखेपूर्वी गुंतवणूक करा.

बँक सुट्ट्या

तसेच, ऑगस्ट महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील असे आरबीआयने सांगितले आहे. अनेक सणांमुळे बँकांना अधिक सुट्या राहणार आहेत. तुमचे काही काम असेल आणि जे बॅंकेत गेल्याशिवाय पूर्ण होणार नाही, तर ते त्वरित पूर्ण करा.

गॅस सिलिंडर स्वस्त होऊ शकतो

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. उद्या तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात करु शकतात, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. याशिवाय, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो.

हा बदल जीएसटीबाबत होणार आहे

सरकारच्या घोषणेनुसार, 1 ऑगस्ट 2023 पासून, 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक पावत्या द्याव्या लागतील. अशा परिस्थितीत, जीएसटीच्या कक्षेत येणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित नियमांची तपशीलवार माहिती घेऊन इलेक्ट्रॉनिक इनवॉइस तयार करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT