Rules Change From July 1, 2023: 1 जुलैपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

Rules Change From July 1, 2023: जून महिना काही दिवसात संपणार आहे. येत्या 3 दिवसांनी देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
Rules Change From July 1, 2023
Rules Change From July 1, 2023Dainik Gomantak

Rules Change From July 1, 2023: जून महिना काही दिवसात संपणार आहे. येत्या 3 दिवसांनी देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

आयकर रिटर्न, क्रेडिट कार्ड आणि एलपीजीसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया जुलैमध्ये कोणते बदल होणार आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रभावित होईल.

जुलैमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील

जुलै महिन्यात बँकेला (Bank) 15 दिवस सुट्या असणार आहेत. या महिन्यात अनेक सण आहेत, त्यामुळे बँका बंद राहणार आहेत. तुमचेही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर त्याआधी सुट्ट्यांची यादी नक्की पाहा.

शूज आणि चप्पलबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे

दुसरीकडे, 1 तारखेपासून देशभरात निकृष्ट दर्जाचे शूज आणि चप्पल उत्पादन आणि विक्रीवर बंदी येणार आहे. सरकारने सांगितले की, 1 तारखेपासून देशभरात क्वालिटी कंट्रोल ऑर्डर (QCO) लागू करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर देशातील सर्व फुटवेअर कंपन्यांना QCO चे पालन करावे लागेल.

जरी ही गुणवत्ता मानके फक्त मोठ्या आणि मध्यम स्तरावरील उत्पादक आणि आयातदारांसाठी लागू असतील, परंतु 1 जानेवारी 2024 पासून, लहान उत्पादकांना देखील त्यांचे पालन करणे अनिवार्य असेल.

Rules Change From July 1, 2023
Rules Change From June 1, 2023: 1 जूनपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या

31 तारखेपर्यंत आयटीआर फाइल करा

याशिवाय, आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे, त्यामुळे तुम्हाला या तारखेपूर्वी तुमचा आयटीआर (ITR) भरावा लागेल. 31 जुलैच्या आत ITR भरला नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

हा नियम क्रेडिट कार्डांना लागू होईल

तसेच, 1 जुलै 2023 पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर टीसीएस (TCS) शुल्क आकारण्याची तरतूद असू शकते. याअंतर्गत, जर तुमचा खर्च 7 लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला 20 टक्के TCS भरावा लागेल.

शिक्षण आणि औषधोपचाराशी संबंधित खर्चावर ही फी 5 टक्के आकारण्यात येणार आहे. परदेशातील शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या करदात्यांना 7 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 0.5 टक्के टीसीएस फी भरावी लागेल.

Rules Change From July 1, 2023
Changes From 1 January 2023: बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून अनेक नियमांमध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या

गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे

त्याचबरोबर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलले जातात. सरकारी तेल कंपन्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com