Rule Change: 1 एप्रिल 2023 पासून मोदी सरकारने केले 20 मोठे बदल, लगेच जाणून घ्या

Income Tax: देशात 2023-24 हे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. यासोबतच काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax: देशात 2023-24 हे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. यासोबतच काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

1 एप्रिल 2023 पासून देशात अनेक नियम बदलले आहेत. यातील काही नियमांचा लोकांना फायदा होणार आहे, तर काही नियमांचा लोकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

या नियमांचा देशातील जनतेवर मोठा परिणाम होणार आहे. आयकरापासून टोल आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीपर्यंत अनेक बदल झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

हे बदल 1 एप्रिल 2023 पासून झाले आहेत.

-नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट पर्याय बनली.

- 87A अंतर्गत सूट वाढून 25,000 रुपये झाली.

- नव्या करप्रणालीत वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.

- सेवानिवृत्तीवर Leave Encashment ची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

Money
Income Tax Return: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान, तुम्हाला भरावा लागू शकतो एवढा मोठा दंड!

- डेट म्युच्युअल फंडांवर LTCG लाभ नाही.

-NSE व्यवहार शुल्कात 6% वाढ मागे घेणार आहे.

-5 लाख वार्षिक प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर आकारला जाईल.

-2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त EPFO ​​योगदानावर कर आकारला जाईल.

- 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेच्या व्यवहारांवर कॅपिटल गेन टॅक्स (Tax) लावला जाईल.

-ऑनलाइन गेमिंग बक्षिसावर TDS लागू होईल.

- विमा कंपन्यांचे कमिशन ईओएम अंतर्गत असेल.

-हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये 6-अंकी HUID असणे आवश्यक आहे.

-एक्स-रे मशीनची आयात 15 टक्के महागणार आहे.

-अत्यावश्यक औषधे 12 टक्के महाग होतील.

- सिगारेट, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ महागणार.

Money
Income Tax: करदात्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय; असा वाचवू तुम्ही शकता टॅक्स

-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 18 टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे.

-2,000 रुपयांवरील सर्व UPI व्यवहारांवर आता व्यापाऱ्याकडून 1.1% इंटरऑपरेबिलिटी शुल्क आकारले जाईल. UPI पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही.

- व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत कमी झाली.

-नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट उपलब्ध असेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेवीची कमाल मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी, एकल खात्यातील रक्कम 4.5 लाख रुपयांवरुन 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी 7.5 लाख रुपयांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com