रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI कडून सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट, रेपो दरात नो-चेंज

महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान 22 मे 2020 रोजी रेपो दर (repo rate) 0.4 टक्क्यांनी कमी केल्यापासून मध्यवर्ती बँकेने (Central bank) गेल्या आठ पुनरावलोकनांमध्ये धोरण दर अपरिवर्तित ठेवले आहेत.

दैनिक गोमन्तक

गृह-कार कर्ज (Home-car loan) पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. कारण आरबीआयने (RBI) पुन्हा एकदा मुख्य व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर (repo rate) 4 टक्के ठेवण्यात असून, रिव्हर्स रेपो दर (Reverse repo rate) 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सेन्सेक्स (Sensex) पुन्हा 60 हजारांच्या वर पोहोचला आहे. निफ्टी देखील 50 म्हणजेच 17,896.70 अंकांवर व्यवहार करत आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी पतधोरण आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.

जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के

रिझर्व्ह बँकेने 2021-22 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के न इतकाच ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची (एमपीसी) द्विमासिक तीन दिवसांची बैठक 6 ऑक्टोबर रोजी सुरू झालेली बैठक आज संपली. बैठकीनंतर आरबीआयने प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नसल्याची ही आठवी वेळ आहे. तथापि, तज्ञांनी या आधीच सांगितले होते की, आरबीआय मुख्य व्याज दरामध्ये छेडछाड करणार नाही. एचडीएफसी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरुआ म्हणाले, रिझर्व्ह बँक आपल्या चौथ्या द्विमासिक आर्थिक पुनरावलोकनात मुख्य व्याजदर अपरिवर्तित ठेवू शकते.

आठव्या वेळी दर वाढला नाही

महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान 22 मे 2020 रोजी रेपो दर 0.4 टक्क्यांनी कमी केल्यापासून मध्यवर्ती बँकेने गेल्या आठ पुनरावलोकनांमध्ये धोरण दर अपरिवर्तित ठेवले आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, मध्यवर्ती बँकेने सलग आठव्यांदा धोरणात्मक दर कायम ठेवली आहे.

महागाई मध्ये घट

शक्तिकांत दास म्हणाले, उपभोक्ता मूल्य जुलै 2021 मध्ये 5.59 टक्क्यांवरून ऑगस्ट 2021 मध्ये 5.3 टक्क्यांवर आले आहे. साथीच्या रोगांमुळे निर्बंध कमी केल्याने आणि क्षमता सुधारण्याबरोबरच पुरवठा देखील सुधारला आहे. उपभोगक्ता अद्यापही पुर्नप्राप्तीच्या परिस्थितीमध्ये आहे, एमपीसीवर व्याज दर किंवा अनुकूल स्थिती बदलण्यासाठी त्वरित दबाव नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT