Deposits of banks in the country doubled in seven years Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI: देशातील बँकांच्या ठेवी सात वर्षात दुप्पट, पहिल्यांदाच 200 लाख कोटींचा टप्पा पार

Deposits In Indian Banks: आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी 176 लाख कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये आहेत आणि उर्वरित पैसे बचत आणि चालू खात्यांमध्ये आहेत.

Ashutosh Masgaunde

Deposits of banks in the country doubled in seven years, crossed the 200 lakh crore mark for the first time, according to RBI:

देशातील बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेत सात वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवींनी पहिल्यांदाच २०० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ५ ते ६ टक्के व्याज असूनही बँकांमध्ये पैसे जमा करण्यावर लोकांचा विश्वास असल्याचे यावरून दिसून येते.

RBI च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2016 मध्ये बँकांमध्ये जमा झालेली एकूण रक्कम 100 लाख कोटी रुपये होती. त्यात वार्षिक आधारावर ९.५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

भारतीय बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांचा हा आकडा कमीत कमी वेळेत १०० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 29 डिसेंबर 2023 पर्यंत बँक ठेवींचा आकडा 200.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचला.

2022 च्या तुलनेत यामध्ये 2023 साली 13.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असताना बँक ठेवींमध्येही वाढ झाली आहे.

शेअर बाजाराचे भांडवलीकरण 373 लाख कोटी रुपये असताना, म्युच्युअल फंडांची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) म्हणजेच गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य प्रथमच 50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

फंड हाऊसेसच्या एयूएममध्ये 10 वर्षांत सहा पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी त्यात 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.

159.6 लाख कोटी कर्ज

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी 176 लाख कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये आहेत आणि उर्वरित पैसे बचत आणि चालू खात्यांमध्ये आहेत.

बँकांनी या कालावधीत 159.6 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. 2022 च्या तुलनेत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे.

1997 मध्ये बँकांमध्ये जमा झालेली रक्कम 5.1 लाख कोटी रुपये होती. चार वर्षांत ते 10 लाख कोटी रुपये झाले. यानंतर मार्च 2006 मध्ये ही रक्कम दुप्पट होऊन 20 लाख कोटी रुपये झाली. मार्च 2006 ते जुलै 2009 या कालावधीत हा आकडा सर्वाधिक वेगाने वाढून 40 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT