Bank Holidays May 2023
Bank Holidays May 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays May 2023: बँकेची कामे त्वरित मार्गी लावा; मे महिन्यात 11 दिवस बँका असणार बंद

दैनिक गोमन्तक

Bank Holidays May 2023: एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. एप्रिलमध्ये एकूण 15 दिवस बँका बंद होत्या.

मे महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत बँकेतील व्यवहाराशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते त्वरित निकाली काढा.

आरबीआयच्या बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, मे महिन्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह बँका एकूण 11 दिवस बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या 1 मे रोजी मे डे असल्याने सुरू होणार आहेत.

महाराष्ट्र, आसाम, बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये सरकारी आणि खाजगी बँका या दिवशी बंद राहतील. त्याचबरोबर या महिन्याची शेवटची सुट्टी रविवारी असणार आहे.

मे 2023 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1 मे - मे दिवस/महाराष्ट्र दिन (सोमवार) - महाराष्ट्र, आसाम, बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल

5 मे - बुद्ध पौर्णिमा (शुक्रवार) - दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड

7 मे - रविवार - राष्ट्रीय सुट्टी

9 मे - रवींद्रनाथ टागोर यांचा वाढदिवस (मंगळवार) - पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.

13 मे - दुसरा शनिवार - राष्ट्रीय सुट्टी

14 मे - रविवार - राष्ट्रीय सुट्टी

16 मे (मंगळवार) - राज्यत्व दिन - सिक्कीम

21 मे - रविवार - राष्ट्रीय सुट्टी

22 मे - महाराणा प्रताप जयंती - सोमवार - हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.

27 मे - चौथा शनिवार - राष्ट्रीय सुट्टी

28 मे - रविवार - राष्ट्रीय सुट्टी

ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील

बँका सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन सेवा सुरू राहतील. यासोबतच एटीएममध्ये उपलब्ध असलेल्या सेवाही पूर्णपणे सुरू राहतील. कोणत्याही एटीएममध्ये जाऊन तुम्ही सहज पैसे काढू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

SCROLL FOR NEXT