अॅपलने नुकतेच जारी केलेले iOS 18.5 अपडेट आता वापरकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अपडेटद्वारे अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली असताना आता अनेक आयफोन वापरकर्ते मेल अॅपशी संबंधित एका मोठ्या समस्येची तक्रार करत आहेत. मेल अॅप ओपन करताच स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक किंवा व्हाईट होते. एवढचं नाहीतर अॅप फ्रीज होते किंवा क्रॅश होते. अनेक अॅपल वापरकर्ते या समस्येचा सामना करत आहेत.
दरम्यान, iOS 18.5 अपडेटनंतर मेल अॅपमध्ये ब्लॅक स्क्रीन दिसते. अॅप ओपन करताच यूजर इंटरफेस लोड होत नाही. अॅप एकतर फ्रीज होते नाहीतर आपोआप बंद होते. काही वापरकर्त्यांची मेल लिस्ट लोड होत नाही. तसेच, इनबॉक्सही रिफ्रेश होत नाही, मात्र नोटिफिकेशन येत राहतात.
अॅपलने अद्याप या मेल अॅपमधील बगबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच कोणताही सॉफ्टवेअर पॅच किंवा अपडेट जारी केलेले नाही. अशा परिस्थितीत, वापरकर्ते संतापले आहेत. अनेक लोकांसाठी हे अॅप बिझनेस किंवा पर्सनल संवादाचे साधन आहे.
अॅपल येणाऱ्या iOS 18.5.1 किंवा iOS 18.6 मध्ये हा बग दुरुस्त करु शकते अशी शक्यता आहे. अशा समस्यांसाठी अॅपल अनेकदा इमरजन्सी फिक्स रोल आउट करते. त्यामुळे तोपर्यंत वापरकर्त्यांना इतर मेल अॅप्स (जसे की Gmail, Outlook) चा वापर करावा लागेल किंवा अॅपलच्या पुढील अपडेटची वाट पहावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.