
भारतीय ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. देशातील नामांकित स्मार्टफोन निर्माता लावाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Lava Shark 5G भारतात लॉन्च केला आहे. अवघ्या रूपये 7,999 किंमतीत सादर करण्यात आलेला हा फोन थेट Samsung Galaxy F06 5G आणि POCO C75 5G सारख्या बजेट सेगमेंटमधील दिग्गज स्मार्टफोनना आव्हान देणार आहे.
Lava Shark 5G हा फोन ग्लॉसी फिनिशसह येतो आणि सोनंरी व निळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. जास्त डिझाईन हव्या असणाऱ्या ग्राहकांसाठी हा मोबाईल एक आकर्षक निवड ठरू शकते.हा स्मार्टफोन लावाच्या अधिकृत ई-स्टोअरवर तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. सध्या कोणतीही लाँच ऑफर नाही.
8,000 पेक्षा कमी किमतीत 5जी सपोर्ट, Android 15, मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह Lava Shark 5G बाजारात येताच स्पर्धा प्रचंड वाढली आहे. Samsung Galaxy F06 5G आणि POCO C75 5G सारख्या मॉडेल्ससमोर आता ग्राहकांसाठी आणखी एक अफोर्डेबल पर्याय उभा राहिला आहे.
प्रोसेसर व रॅम:
हा फोन 6nm प्रक्रियेवर आधारित Unisoc T765 प्रोसेसरसह येतो, जो उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. यामध्ये 4 जीबी रॅम असून, 4 जीबी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय दिला आहे, म्हणजेच एकूण रॅम 8 जीबी होतो.
डिस्प्ले:
Lava Shark 5G मध्ये 6.75 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, 90Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रीन अधिक स्मूत वाटते.
स्टोरेज:
फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे 512 जीबीपर्यंत वाढवता येते.
कॅमेरा:
फोनच्या मागील बाजूस 13 MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि 5 MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे.
बॅटरी व चार्जिंग:
Lava Shark 5G मध्ये 5000mAh बॅटरी असून, ती 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. मात्र, रिटेल बॉक्समध्ये फक्त 10W चार्जर दिला जातो.
सॉफ्टवेअर:
या फोनमध्ये Android 15 आउट ऑफ द बॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना क्लीन व नवीन सॉफ्टवेअर अनुभव मिळतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.