Money Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार लागू! कर्मचाऱ्यांचा पगार...

8th Pay Commission Update: आता 8व्या वेतन आयोगाच्या अपडेटबाबत सरकारकडून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन करु शकते.

Manish Jadhav

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ केली असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे.

आता 8 व्या वेतन आयोगाच्या अपडेटबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन वेतन आयोग लागू करु शकते, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

2024 मध्ये आठव्या आयोगाअंतर्गत (8th Pay Commission Update) कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.

नवीन वेतन आयोगाचे काम कधी होणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वेतन आयोगाचे काम सार्वत्रिक निवडणुकीनंतरच होणार आहे. सध्या नवीन वेतन आयोगाबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरु आहे. देशभरात आंदोलन सुरु आहे.

बंगालसह अनेक राज्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारकडून (Government) सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, याबाबतची माहिती संसदेत प्राप्त झाली आहे.

चौथ्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ झाली?

पगारात वाढ - 27.6 टक्के

किमान पगार - रु 750

पाचव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले?

पगारात वाढ - 31 टक्के

किमान पगार - रु 2,550

सहाव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले?

फिटमेंट फॅक्टर - 1.86 पट

पगारात वाढ – 54 टक्के

किमान पगार - रु 7,000

सातव्या वेतन आयोगाने (फिटमेंट फॅक्टर) कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ केली?

फिटमेंट फॅक्टर - 2.57 पट

पगारात वाढ - 14.29 टक्के

किमान पगार - रु. 18,000

8 व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ केली (फिटमेंट फॅक्टर)

फिटमेंट फॅक्टर - 3.68 पट शक्य

पगारात वाढ - 44.44%

किमान वेतन - रु 26000 शक्य आहे

2024 मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो

सरकार 2024 च्या अखेरीस नवीन वेतन आयोग लागू करु शकते आणि 2026 मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात सर्वात मोठी वाढ होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत यामध्ये मोठे बदल होऊ शकतात. सुमारे 10 वर्षांनी वेतन आयोगात बदल करण्यात आला आहे.

अशी माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली

यापूर्वी, संसदेत माहिती देताना सरकारने सांगितले होते की, सध्याची परिस्थिती पाहता याचा विचारही नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याबाबत स्पष्ट नकार दिला. नवीन वेतन आयोगाबाबत सरकार विचार करेल तेव्हा 2024 हे वर्ष योग्य असेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Film Premiere: इफ्‍फीत ‘हिसाब बराबर’ सिनेमाचा जागतिक प्रीमियर; इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार ‘अमर आज मरेगा’ चित्रपट

Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

Pramod Sawant: गोव्यात पुन्हा धर्मांतर खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा रोख नेमका कुणाकडे?

Margao Municipality: पाणी, वीजजोडणी आदेशांच्या नोंदीचा अभाव; पालिका अधिकाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

Ponda Parking Problem: फोंड्यात पार्किंग समस्या जटिल! वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; कायदेशीर कारवाईची होतेय मागणी

SCROLL FOR NEXT