7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचार्यांसाठी जानेवारी महिन्याच्या डीए वाढीबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
डीएची वाढलेली रक्कम मार्च महिन्याच्या पगारात मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही फेरबदलाची चर्चा सुरु झाली आहे. म्हणजेच, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष खूप चांगले असणार आहे.
येत्या वर्षभरात वेतन आयोग रद्द करुन नवीन फॉर्म्युला लागू करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु आहे.
या बदलांतर्गत कर्मचाऱ्यांच्या (Employees) फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येऊ शकते.
आपल्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.
नवीन आर्थिक वर्षात त्याचा आढावा घेऊन सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमधील बदलाबाबत दोन पक्ष आहेत. पहिल्या पक्षाचे म्हणणे आहे की, फिटमेंट फॅक्टर सध्याच्या 2.57 पट वरुन 3 पट वाढवला पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे 3000 रुपयांनी वाढ होणार आहे.
दुसरा पक्षाचे म्हणणे आहे की, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असावा. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 8000 रुपयांचा बदल होणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरवरील निर्णयानंतर ते 26,000 रुपये होईल. मात्र, याबाबत सरकारकडून (Government) कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
सध्या, फिटमेंट फॅक्टरच्या 2.57 पट आणि मूळ वेतन 18000 रुपये, इतर भत्ते वगळून, रु. 18,000 X 2.57 = रु. 46260. परंतु जर ते 3.68 पर्यंत वाढवले तर इतर भत्ते वगळून कर्मचाऱ्यांचे वेतन 26000 X 3.68 = 95680 रुपये होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.