8th Pay Commission Update Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

8th Pay Commission 5 Major Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली.

Manish Jadhav

8th Pay Commission 5 Major Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली. 8वा वेतन आयोग हा सध्याचा सर्वात मोठा आणि चर्चेचा विषय बनला असून, नवीन वेतनात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असणार आणि बेसिक पे मध्ये किती वाढ होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. वेतन आयोगाचे कामकाज वेगाने सुरु असून, देशातील विविध शहरांमध्ये सल्लागार बैठकांचे सत्र सुरु आहे.

8व्या वेतन आयोगाचे 5 महत्त्वाचे अपडेट्स

1. मुंबईत 22 आणि 23 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक: आयोगाची पुढची बैठक मुंबईत होणार असून, यासाठी 21 सप्टेंबर रोजीच नोटीस जारी करण्यात आली होती. या बैठकीत कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संघटनांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार आहे. जर तुमच्या संघटनेचा यात समावेश असेल, तर ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

2. बंगळुरुमध्ये बैठक संपन्न: मुंबईतील बैठकीपूर्वी आयोगाने 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी बंगळुरुमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश फिटमेंट फॅक्टर आणि सॅलरी स्ट्रक्चरवर विचारमंथन करणे हा होता.

3. सल्लागार नेमणुकीचे नियम झाले सोपे: आयोगाने 11 ऑक्टोबर रोजी एक नवीन प्रशासकीय नोटीस जारी केली. यानुसार आता आयोग जलद गतीने आणि सहजपणे तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करु शकेल. यामुळे सॅलरी कॅलक्युलेशन, डेटा ॲनालिसिस आणि फायनान्शियल कॅलक्युलेशनचे काम आणखी वेगाने पूर्ण होईल.

4. 18 महिन्यांची मुदत आणि मे-जून 2027 मध्ये फायनल रिपोर्ट: केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या समितीच्या अध्यक्षा असून, प्रोफेसर पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य-सचिव आहेत. आयोगाला आपल्या शिफारसी तयार करण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ मिळाला असून, मे किंवा जून 2027 पर्यंत अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द होण्याची शक्यता आहे.

5. 1 जानेवारी 2026 पासून मिळणार बंपर एरियर? आयोगाचा अहवाल 2027च्या मध्यात आला आणि सरकारच्या मंजुरीनंतर तो 2027च्या उत्तरार्धात लागू झाला, तरीही नव्या वेतनमान संरचनेची तारीख 1 जानेवारी 2026 च मानली जाण्याची दाट शक्यता आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंतचा संपूर्ण एरियर एकरकमी खात्यात मिळेल.

8व्या वेतन आयोगाचे काम ठरलेल्या वेळेत आणि पूर्ण वेगाने सुरु आहे. 22-23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबई बैठकीनंतर युनियनच्या भूमिकेवरुन बेसिक सॅलरी, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता याविषयीचा कल पूर्णपणे स्पष्ट होईल. वाढीव पगारासाठी 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी एरियरच्या स्वरुपात मिळणाऱ्या मोठ्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SIR Process Goa: 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8' डावलता येणार नाही! गोवा खंडपीठात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

Bulbul Film Festival: 'बुलबुल' महोत्सवात विद्यार्थ्यांची मांदियाळी! एकाच दिवशी सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT