DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

Tripura Government Dearness Allowance Increase: त्रिपुरा सरकारने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली.
Tripura Government Dearness Allowance Increase
DA HikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Tripura Government Dearness Allowance Increase: त्रिपुरा सरकारने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री माणिक साहा आणि वित्त मंत्री प्रणजीत सिंहा रॉय यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या नव्या वाढीनंतर आता त्रिपुराच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 41 टक्क्यांवरुन थेट 44 टक्क्यांवर पोहोचला. विशेष म्हणजे, या बदलाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून झाली असून, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव वेतन येणार आहे.

या निर्णयामुळे राज्य सरकारवर दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, राज्यासमोर आर्थिक आव्हाने असली तरी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यास प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महागाई भत्त्यासोबतच राज्य सरकारने घरभाडे भत्त्यामध्येही महत्त्वपूर्ण सुधारणा केली. नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के इतका एचआरए मिळणार आहे, ज्याची कमाल मर्यादा दरमहा 10,000 रुपये निश्चित करण्यात आली. त्यामुळे जास्त मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या मर्यादेपर्यंतचा लाभ मिळेल.

Tripura Government Dearness Allowance Increase
8th Pay Commission News: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

दरम्यान, त्रिपुराच्या (Tripura) कर्मचाऱ्यांचा डीए अद्यापही केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत काहीसा मागे आहे, मात्र हा फरक टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल, असे सरकारने म्हटले. याशिवाय केंद्र सरकारने सुरु केलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेवरही राज्य सरकारचे लक्ष असून, त्याची समीक्षा केली जात आहे. 2017-18 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्रिपुरा सरकारने 7वा वेतन आयोग लागू करुन फिटमेंट फॅक्टरद्वारे मूळ वेतनात 14.22 टक्क्यांची वाढ केली होती. आता या नव्या घोषणेमुळे राज्यातील हजारो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या चेहऱ्यावर सणासुदीच्या तोंडावर हसू फुलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com