Deloitte's Global Powers of Luxury Goods rankings 2023. 
अर्थविश्व

Deloitte's: जगातील 100 अव्वल लक्झरी वस्तू उत्पादकांमध्ये 6 भारतीय कंपन्यांचा समावेश

Luxury Goods: भारतीय अर्थव्यवस्था जसजशी वाढत आहे, तसतशी ग्राहकांची पसंती विकसित होत आहे. देशाच्या लक्झरी मार्केटमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

Ashutosh Masgaunde

6 Indian companies among top 100 luxury goods manufacturers in the world, as per Deloitte's Global Powers of Luxury Goods rankings 2023:

सहा भारतीय कंपन्यांनी लक्झरी उत्पादने बनवणाऱ्या जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

या सहा कंपन्यांमध्ये मलबार गोल्ड आणि डायमंड्स आणि टायटनसह अन्य चार भारतीय दागिने उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

मलबार गोल्ड ही देशांतर्गत आघाडीची कंपनी आहे, जी सोमवारी प्रसिद्ध झालेल्या डेलॉइट्स च्या 'ग्लोबल लक्झरी गुड्स लिस्ट-2023' मध्ये 19 व्या क्रमांकावर आहे.

टाटा समूहातील टायटन कंपनी २४व्या क्रमांकावर आहे. विविध क्षेत्रात काम करणारी फ्रेंच लक्झरी कंपनी LVMH या यादीत अव्वल स्थानावर आहे. पीव्हीएच कॉर्प दुसऱ्या स्थानावर आणि रिचेमॉन्ट तिसऱ्या स्थानावर आहे.

डेलॉइट्सने अहवालात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था जसजशी वाढत आहे, तसतशी ग्राहकांची पसंती विकसित होत आहे. देशाच्या लक्झरी मार्केटमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, ज्यामुळे देशांतर्गत ब्रँडची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. देशातील लक्झरी उत्पादनांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. हे देशांतर्गत ब्रँड्सना जागतिक स्तरावर उदयास येण्यासाठी भरपूर संधी प्रदान करेल.

अहवालानुसार, जगातील टॉप-100 लक्झरी उत्पादन विक्रेत्यांनी 2023 मध्ये एकूण $347 अब्जचा व्यवसाय केला. वार्षिक आधारावर ही 13.4 टक्के वाढ आहे. एकूण $347 अब्ज उलाढालीत LVMH चा वाटा 31 टक्के आहे.

डेलॉइट्सच्या मते, लक्झरी उत्पादने बनवणाऱ्या जगातील टॉप 10 कंपन्याकडे बाजारपेठेचा 63 टक्के वाटा आहे.

वार्षिक आधारावर त्यांच्या विक्रीत 23 टक्के वाढ झाली आहे. टॉप-100 कंपन्यांच्या एकूण निव्वळ नफ्यात त्यांचा वाटा 76.4 टक्के आहे.

लक्झरी वस्तू उत्पादन करणाऱ्या जगातील 100 अव्वल कंपन्यांमधील भारतीय कंपन्यांची क्रमवारी

1) मलबार गोल्ड अँड डायमंड्स - 19 वा क्रमांक

2) टायटन - 24 वा क्रमांक

3) कल्याण ज्वेलर्स - 46 वा क्रमांक

4) जॉय अलुक्कास - 47 वा क्रमांक

५) सेन्को गोल्ड अँड डायमंड्स - ७८ वा क्रमांक

6) थंगामाईल ज्वेलरी - 98 वा क्रमांक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT