येत्या काळात शेअर मार्केटवर जागतिक बाजारपेठेचा परिणाम होणार

The stock market will be affected by the global market in the coming period
The stock market will be affected by the global market in the coming period
Published on
Updated on

नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारातील तेजी (बीएसई सेन्सेक्स-निफ्टी) कायम आहे. पुढील आठवड्यात जागतिक स्थिती बाजारातील हालचाली ठरवू शकते. तज्ज्ञांच्या मते कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, अशा परिस्थितीत बाजारातही थोडी घसरणही दिसून येऊ शकते. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीच्या कलाचाही बाजारावर परिणाम दिसू शकतो.शेअर निर्देशांकाच्या अंदाजात नुकतीच घसरण झाली आहे, परंतु असे होण्याची कोणतेही चिन्हे नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. तिमाही निकाल जाहीर करण्याची वेळ जवळजवळ निघून गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील कल पाहून बाजाराची पुढील दिशा ठरू शकते.

शेअर मार्केट तज्ञांचा अंदाज

सेमको सिक्युरिटीज शेअर बाजाराच्या संशोधन विभागाच्या प्रमुख निराली शाह यांच्या मते, “सर्व मोठ्या उलाढालीच्या अंदाजानुसार बाजारात आतापर्यंत वाढ झाली आहे. येत्या आठवड्यात, समायोजन किंवा किंमतींमध्ये निरोगी घट होऊ शकते. जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांचे मत आहे की सुधारवादी अर्थसंकल्पानंतर बाजारात आता जोरदार घसरण दिसून येईल.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; विमान प्रवास महागणार

गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती?

बाजाराची घौडदोड सकारात्मक राहील, परंतु जागतिक बाजाराच्या ट्रेंडचा बाजारावर परिणाम होऊ शकेल. युरोपियन बाजारात कमकुवततेमुळे जागतिक बाजारपेठेत असेच होण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात बीएसई 30 सेन्सेक्स 812.67 अंकांनी म्हणजेच 1.60 टक्क्यांनी नफ्यात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com