Viral Video: संतापजनक! ट्रेन पकडणाऱ्या मुलींची छेडछाड; एक जण ट्रेनखाली पडली आणि…

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले धावत ट्रेन पकडणाऱ्या मुलींची छेड काढत आहेत.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले धावत ट्रेन पकडणाऱ्या मुलींची छेड काढत आहेत. याचदरम्यान, एका मुलाने एका मुलीला सायकलवरुन धक्का दिला आणि ती ट्रेनखाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुलं सायकल घेऊन ट्रेनमधून खाली उतरताना दिसत आहेत. ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि काही मुली ट्रेन पकडण्यासाठी धावत आहेत. त्याचदरम्यान सायकल घेऊन उतरणारी मुलं मुलींची छेड काढताना दिसत आहेत. धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलींना सायकल घेऊन ट्रेनमधून उतरणारी मुलं धक्का देताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. दरम्यान, एका मुलाने एका मुलीला सायकलवरुन धक्का दिला आणि तिचा तोल गेला, ती पडली आणि ट्रेनखाली सापडली.

Viral Video
America Crime: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर पुन्हा हल्ला; रेस्टॉरंटबाहेर हाणामारीत मृत्यू

दरम्यान, उपस्थित प्रवाशांनी प्रसंग सावधान राखत रेल्वे चालकाला याची माहिती दिली. मुलगी वाचली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, या व्हिडिओच्या आधारे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. तर दुसऱ्याने लिहिले की, या मुलांना चौकात शिक्षा झाली पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, कोणताही माणूस असं वागू शकत नाही. आणखी एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, या घटनेचा व्हिडिओ अतिशय भयानक आहे.

Viral Video
America: आता कॅलिफोर्नियातही शिकवली जाणार 'हिंदी'; सरकारी शाळांमध्ये जागतिक भाषा म्हणून होणार समाविष्ट!

दरम्यान, ही घटना आयर्लंडमधील डब्लिन स्टेशनवर घडली. ही घटना 2021 मध्ये घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे जो 17 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com