Swayampurna Goa: नोव्हेंबरपासून ग्रामीण उत्पादने ‘ॲप’वर

Swayampurna Goa: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-बाजारचे उद्‍घाटन : स्थानिक उत्पादने राष्ट्रीय स्तरावर
Swayampurna Goa
Swayampurna GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Swayampurna Goa: स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या माध्यमातून गावागावांत विविध उत्पादने तयार होऊ लागली आहेत. या उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. या ई-बाजारचे उद्‍घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवारी) मंत्रालयात केले.

Swayampurna Goa
Goa Crime News: बलात्‍कार प्रकरणातील अन्सारीला जामीन

स्वयंपूर्ण गोवा या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही उत्पादने देशभरातील जनतेला खरेदी करता येतील. 1 नोव्हेंबरपासून यासाठी ॲपही उपलब्ध केले जाणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की गणेश चतुर्थीच्या काळात ई-बाजार ही संकल्पना ‘स्वीगी’च्या सहकार्याने राबविली. तिला मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सरकारवर फारसा आर्थिक बोजा न पडता ही संकल्पना राबवण्याचे ठरले आहे.

सामुदायिक सुविधा केंद्र या केंद्र सरकारच्या उपक्रमाला सोबत घेत ही योजना पुढे नेली जाणार आहे. राज्यातील सुमारे 191 पंचायत क्षेत्रांतील नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. ही योजना केवळ महिलांसाठी नसून पुरुषही आपली उत्पादने या माध्यमातून विकू शकतात, अशी माहिती देण्यात आली.

Swayampurna Goa
Art Field In Goa: कला क्षेत्रात युवकांना मोठ्या संधी

मोफत प्रशिक्षण

स्वयंपूर्ण गोवा मोहिमेंतर्गत अशी उत्पादने तयार कऱणाऱ्यांना पॅकिंग, ब्रॅण्डिंग आणि विपणनाचे प्रशिक्षण सरकार मोफत देणार आहे. विश्वकर्मा योजनेखाली नोंदणी केल्यावर त्यांना केवळ 4 टक्के दराने सुरवातीला १ लाख रुपयांचे तर त्याची परतफेड केल्यावर 2 लाख रुपयांचे कर्ज व्यवसाय वृद्धीसाठी देण्यात येणार आहे.

26 महिलांची नोंदणी : आतापर्यंत 26 महिलांनी यासाठी नोंदणी केली असून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत चाचणी स्वरूपात हे संकेतस्थळ चालवले जाईल. १ नोव्हेंबरपासून ते जनतेसाठी खुले होणार आहे. नियोजन सांख्यिकी खात्याच्या माध्यमातून सरकारने हा मंच उपलब्ध केला आहे. त्या खात्याचे संचालक विजय सक्सेना आणि वस्रोद्योग संचालक अरविंद बुगडे यावेळी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com