5Gs speed 10 times faster in India Dainik Gomantak
अर्थविश्व

देशात 4Gच्या तुलनेत 5Gचा वेग 10 पट अधिक, ooklaचा दावा

दैनिक गोमन्तक

ग्लोबल इंटरनेट टेस्टिंग ओक्लाच्या (Ookla) अहवालानुसार, भारतात 5G (India 5g Network) लाँच केल्यामुळे सध्या 4G-LTE नेटवर्कद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या डाउनलोड स्पीडच्या (Internet Download Speed ) तुलनेत सरासरी डाउनलोड स्पीड 10 पट वाढण्याची क्षमता आहे.अचूक स्पेक्ट्रम वाटप आणि रोलआउट योजनेबद्दल अनिश्चितता याचाच विचार केला असता भारतीय वापरकर्त्यांसाठी 5G किती वेगवान असेल हे सांगणे अशक्य आहे परंतु नेटवर्क स्पीड वाढेल हे मात्र नक्की असल्याचे वर्तवले जात आहे. (5Gs speed 10 times faster in India)

ओक्लाचे मूल्यांकन आणि सरासरी डाउनलोड स्पीडमध्ये 10x पर्यंत वाढ शोधणे हे आशियाई देशांमध्ये नेटवर्कच्या इंटरनेट स्पीडच्या चाचणीवर आधारित आहे जेथे 5G सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.उदाहरणार्थ, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये, जेथे 2020 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत व्यावसायिक 5G सेवा सुरू करण्यात आल्या होत्या, 5G नेटवर्कवरील इंटरनेट डाउनलोड गती 231.45 Mbps आणि 151.08 Mbps पर्यंत पोहोचली. 4G चा स्पीड 25.99 Mbps आणि 15.12 Mbps होता. ओक्लाच्या मते, भारतात, रिलायन्स जिओ इन्फोकॉमची डाउनलोड स्पीड, ज्याने 5 जी चाचणीमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे, गेल्या 6 महिन्यांत आधीच वाढलेली पाहायला मिळाली आहे.

भारतात ऑपरेटरची सरासरी डाउनलोड गती मार्च 2021 मध्ये 5.96 Mbps वरून जूनमध्ये 13.08 Mbps झाली आहे. त्याची अपलोड गती आणि सातत्य स्कोअर देखील लक्षणीय सुधारला असल्याचे ओक्लाने सांगितले आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम, भारती एअरटेल आणि VI या तिन्ही खाजगी टेलिकॉम दूरसंचार विभागाला स्पेक्ट्रम वाटपाचा स्पष्ट रोड मॅप आणि 5G फ्रिक्वेंसी बँड तयार करण्याची विनंती करत आहेत.

5G रोल आऊटमध्ये भारत जागतिक बाजारपेठांमध्ये मागे पडला असला तरी ऑपरेटर्सना शेवटी फायदा होऊ शकतो कारण ते कमी किंमतीत नेटवर्क उपकरणे खरेदी करू शकतात तसेच भारतीय ऑपरेटरद्वारे ओपन आरएएन प्रणालीचा अवलंब केल्याने 5 जी रोलआउटची एकूण किंमत कमी होण्यास मदत होईल. 5G स्मार्टफोनच्या किंमती आधीच घसरल्या आहेत आणि हा ट्रेंड कायम राहणार आहे, जिओ प्लॅटफॉर्मच्या भारतात गुगलसोबतच्या भागीदारीमुळे तर हे सगळं सहज शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT