मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अराम्को (Saudi Aramco) यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता आहे. सौदी अराम्को णि रिलायन्स 25 अब्ज डॉलर्स पर्यंतच्या करारासाठी बोलणी करत आहेत. या बातमीनंतर आज रिलायन्सच्या शेअरमध्ये (RIL Shares) जोरदार उडी झाली. 2149.35 च्या पातळीवर उघडल्यानंतर, आज दुपारच्या सुमारास, RIL चा स्टॉक 2192.35 च्या पातळीवर 2.18 टक्क्यांनी वाढला. मागील सत्रात तो 2145.65 पातळीवर बंद झाला होता.(Reliance and Aramco deal, RIL shares on high today)
ब्लूमबर्गच्या मते, अराम्को देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्सच्या ऑइल आर्ममध्ये 20 टक्के हिस्सेदारीसाठी बोलणी करत आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या हवाल्याने ब्लूमबर्ग क्विंटने अहवाल दिला की, येत्या काही आठवड्यांमध्ये हा करार होऊ शकतो.
यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये, सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी तेल आणि रासायनिक व्यवसाय (O2C) मधील 20 टक्के हिस्सा जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांना विकण्याविषयी जाहीर केल होते. कंपनी हा करार मार्च 2020 पर्यंतच पूर्ण करणार होती , परंतु त्यात विलंब झाला. मात्र,कंपनीकडून याचे कारण देण्यात आले नाही.
सौदी अरेबियन तेल कंपनी अराम्कोचे अध्यक्ष यासीर अल रुमायन यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्येही भाग घेतला. त्यांनी स्वतंत्र संचालक म्हणून बैठकीला हजेरी लावली. एजीएममध्ये मुकेश अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर रुमायनचा समावेश करण्याची घोषणा केली होती त्यांना स्वतंत्र संचालक बनवण्यात आले आहे. या दरम्यान, मुकेश अंबानी म्हणाले की, 'मी रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्डात स्वतंत्र संचालक म्हणून सामील होण्यासाठी सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि पीआयएफचे गव्हर्नर यासीर अल-रमयान यांचे स्वागत करतो.'
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या 14 सदस्यांपैकी निम्मे सदस्य स्वतंत्र संचालक आहेत. यामध्ये एसबीआयचे माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, मॅकिन्झी इंडियाचे माजी प्रमुख आदिल जैनुलभाई, सीएसआयआरचे माजी प्रमुख आरए माशेलकर यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील वाय.पी. त्रिवेदी यावर्षी बोर्डातून निवृत्त झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.