शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हणून स्वीकारलंय: फडणवीस

फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Dainik Gomantak
Published on
Updated on

"महाविकास आघाडी आणि एआयएमआयएम एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. लोक भाजपच्या पाठीशी उभे आहेत. सर्व पक्ष एकत्र आले तरी महाराष्ट्रातील जनतेचा मोदींवर विश्वास आहे. लोक भाजपलाच प्राधान्य देतील," असे विधान नागपुरात बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

Devendra Fadnavis
'एमआयएम'ची राष्ट्रवादी कॉंग्रेसला युतीची ऑफर

दरम्यान फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, "आता शिवसेना (ShivSena) सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे. हे हरले तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते. हरल्यानंतर हे पक्ष असल्या पद्धतीच्या टीका करत असतात," असे फडणवीस म्हणाले. "शिवसेनेनं आधीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणून स्वीकारलेले आहे. अजानची स्पर्धा ते घेऊ लागले आहेत. एआयएमआयएम सोबत युती हे त्याचा परिणाम आहे का पाहू," असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis
देवा रे देवा! लग्नाच आमिष अन् लाखोंना चुना

राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राजू शेट्टी यांच्याशी अजून माझी यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी आमच्यासोबत होते, काही कारणाने ते पलीकडे गेले. कोण आमच्यासोबत येणार कोण नाही, हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.

शिवसेनेने एआयएमआयएम सोबत युती करणे आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. पंतप्रधान मोदी आणि आम्ही करत असलेल्या कामामुळे लोक आम्हाला मतदान करतात. हे सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत, सगळे एकत्र आले तरी फरक पडणार नाही
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com