देवा रे देवा! लग्नाच आमिष अन् लाखोंना चुना

तक्रारीनुसार, गेल्या वर्षी जूनच्या दरम्यान ही महिला एका डॉक्टरच्या संपर्कात आली होती.
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadDainik Gomantak
Published on
Updated on

तक्रारीनुसार, गेल्या वर्षी जूनच्या दरम्यान ही महिला एका डॉक्टरच्या संपर्कात आली होती. त्यानं परदेशात वैद्यकीय प्रॅक्टिस असल्याचं भासवल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. दोघांनी फोन, मेसेंजर आणि व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्यास सुरुवात केल्यानंतर मग त्या व्यक्तीनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. (In Pimpri Chinchwad a woman was robbed of Rs 22 lakh on the pretext of marriage)

Pimpri Chinchwad
Kolhapur by election : काँग्रेस विरूध्द भाजप यांच्यात होणार लढत

या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील म्हणाले की, “डॉक्टर असल्याचं भासवून सायबर घोटाळेबाजांनी फिर्यादीकडून विमान प्रवासाचा खर्च, बँक खाती गोठवल्यानंतर लागणारे पैसे, सोन्यावरील कर, काही प्रकारचे कर अशा बहाण्यांनी पैसे लुटले. अशा प्रकारचे तिला सुमारे 20 व्यवहार (transfer) करण्यास सांगितले होते आणि ते तिनं स्वतःच्या आणि तिच्या आईच्या बँक खात्यांमधून केले असल्याचे समोर आले."

अशी व्यक्ती अस्तित्वातच नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली. फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले फोन नंबर तसेच बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली, असं एका अधिकाऱ्यानं यावेळी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com