Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Arbaz Sayyed Arrested RCF Police: मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कौटुंबिक हिंसेची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली.
Domestic Violence Case
Arbaz Sayyed Arrested RCF PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Domestic Violence Case: मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कौटुंबिक हिंसेची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली. येथे एका 25 वर्षीय नराधमाने आपल्याच पत्नीवर अमानुष अत्याचार करत तिला तब्बल चार तास 'कोंबडा' बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित महिला कोंबडा बनून बसलेली असताना आणि तिला असह्य वेदना होत असतानाही हा नराधम थांबला नाही. तो तिला बेल्टने अमानुषपणे मारहाण करत राहिला.

इतकेच नव्हे, तर त्याने तिला लाथा-बुक्क्यांनी तुडवून तिच्यावर ॲसिड फेकण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. अरबाज सय्यद असे या क्रूर पतीचे नाव असून, तो एक अट्टल गुन्हेगार आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या विकृत आरोपीला (Accused) बेड्या ठोकल्या.

Domestic Violence Case
Crime News: मित्रांकडून तरुणाचा निर्घृण खून, नारळ विक्रीच्या पैशावरून वाद; दोन संशयित अटकेत

या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेची सुरुवात एका भयंकर नाट्याने झाली. आरोपी अरबाज याने आधी आपल्या पत्नीला घरात कोंडून ठेवले आणि तिच्यावर तलवारीने हल्ला करण्याची व ॲसिड फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला सलग चार तास 'कोंबडा' बनण्यास भाग पाडले. या छळातून सुटण्यासाठी पीडितेने तिथून कसाबसा पळ काढला आणि ती आपल्या माहेरी पोहोचली. मात्र, या नराधमाचा राग शांत झाला नाही. तो तिच्या माहेरीही पोहोचला, तिथे त्याने गोंधळ घातला आणि पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

Domestic Violence Case
Goa Cyber Crime: विश्वास ठेवला अन्‌ फसले! गुंतवणूक ॲप, सीबीआय अधिकारी अन् रॅकेटचा पर्दाफाश; दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या हल्ल्यात पीडितेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्या हातावर सहा टाके पडले. तिच्या मनगटावर आणि पायावरही चाकूने वार केल्याच्या अनेक जखमा आहेत. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अरबाजला अटक केली.

या अमानुष मारहाणीमुळे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, तिला आता एका कानाने ऐकू येत नाहीये. रुग्णालयात उपचार घेत असताना पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, घरात कोंडून मारहाण करण्यापूर्वी आरोपी तिला जबरदस्तीने रेल्वे ट्रॅकवर घेऊन गेला होता. तिथे त्याने तिला धावत्या ट्रेनसमोर फेकून देऊन मारण्याची धमकी दिली होती. सुमारे दोन तास तो रेल्वे रुळांच्या कडेला हा जीवघेणा ड्रामा करत होता. मात्र, सुदैवाने त्यादरम्यान तिथून कोणतीही ट्रेन आली नाही, त्यामुळे तो तिला पुन्हा घरी घेऊन आला आणि त्याने घरात हा अघोरी छळ सुरु केला.

Domestic Violence Case
Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; बिहारच्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस तपासात समोर आले की, अटक करण्यात आलेला अरबाज सय्यद हा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत आधीपासूनच तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत. आरसीएफ पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. सध्या पीडित महिला (Women) रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवला. तसेच, तिच्या लहान मुलाच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आली. एका हिंस्त्र गुन्हेगाराने स्वतःच्या पत्नीवर केलेल्या या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण मुंबईत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com