Goa Cyber Crime: विश्वास ठेवला अन्‌ फसले! गुंतवणूक ॲप, सीबीआय अधिकारी अन् रॅकेटचा पर्दाफाश; दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

CBI Impersonation Scam: फसवणुकीची तीन मोठी प्रकरणे आज उघडकीस आली.
online investment fraud arrested
online investment fraud arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फसवणुकीची तीन मोठी प्रकरणे आज उघडकीस आली. एका प्रकरणात तेलंगणमधील धनाढ्यांना गोव्यात आणून त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करणारे रॅकेट उघड झाले आहे. दुसऱ्या प्रकरणात मडगाव येथील एका व्यक्तीची बनावट गुंतवणूक ‘ॲप’च्या माध्यमातून २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तर सीबीआय अधिकारी भासवून महिलेला १४ लाखांना फसविल्‍याप्रकरणी साताऱ्यातून एकाला अटक केली आहे.

तेलंगण प्रकरणात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, ‘ॲप’द्वारे फसवणूक प्रकरणात मुख्य संशयिताला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. ॲप’द्वारे फसवणूक केल्याप्रकरणी मयूर वाघे (वय २५ वर्षे, रा. नालासोपारा, वसई, ठाणे) याला ताब्यात घेतल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली. मडगावातील एका व्यक्तीची तब्बल २ कोटी ९ लाख ७८ हजार ६१२ रुपयांची ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिस स्थानकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील ठाणे परिसरातून वाघे या संशयिताला अटक केली आहे.

online investment fraud arrested
Goa Investment Fraud: अधिक परताव्‍याच्‍या आमिषाने 7.36 कोटींचा गंडा; दुबईतील सूत्रधारासह दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद

पोलिस उपनिरीक्षक शेरविन डिसोझा, पोलिस कॉन्स्टेबल यश कोळे आणिसाताराम नर्से यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीच्या बँक खात्यात २६ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम नंतर त्याच्या इतर साथीदारांच्या खात्यांमध्ये वळविल्याचे उघड झाले आहे. पुढील तपासात संबंधित बँक खाते कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील आणखी १२ सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडले असल्याचे समोर आले. या सर्व प्रकरणांतील एकत्रित फसवणुकीची रक्कम सुमारे २ कोटी १० लाख रुपये असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

सावज असे ओढले जाळ्यात

  • १ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून तक्रारदाराशी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क साधला.

  • २ त्यांनी स्वतःला ‘एंजल वन’ या शेअर व्यवहार व्यासपीठाचे प्रतिनिधी असल्याचे भासविले.

  • ३ नंतर ‘ट्रेंडलिटिक’ नावाचे बनावट व्यवहार अ‍ॅप वापरण्यास सांगून शेअर बाजारातील व्यवहारातून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविले.

online investment fraud arrested
Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

अधिक नफ्याच्या आशेने केला घात

तक्रारदाराने आरोपींच्या सांगण्यावरून संबंधित ‘अ‍ॅप’वर नोंदणी करून गुंतवणूक सुरू केली. संशयिताने व्यवहारात मार्गदर्शन करून मोठा परतावा मिळत असल्याचा भास निर्माण केला. हळूहळू अधिक नफ्याचे आश्वासन देत तक्रारदाराकडून विविध बँक खात्यांमध्ये अनेक व्यवहारांद्वारे तब्बल २ कोटी ९ लाख ७८ हजार ६१२ रुपये जमा करून घेण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

बनाव करण्यात आले. प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून आरटीजीएस व्यवहाराद्वारे ॲक्सिस बँकेच्या खात्यात एकूण ₹१४ लाख जमा करून घेतले. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढत पीएसआय मंदार गावकर, पोलिस कॉन्स्टेबल महेश नाईक आणि संताराम नर्से यांच्या पथकाने साताऱ्यातील शिरवळ-खंडाळा परिसरात कारवाई करून योगेश शाह याला ताब्यात घेतले.

online investment fraud arrested
Goa Document Fraud Case: सां जुझे दी आरियालमध्ये जमिनीच्या म्युटेशनमध्ये फसवणूक; गुन्हा दाखल

तेलंगणमधील पर्यटकांना लाखोंची ‘टोपी’; रॅकेट उघड

तेलंगणमधील महबूबनगर परिसरातील व्यापारी, नोकरदार आणि शेतकऱ्यांना गोव्याच्या सहलीचे आमिष दाखवून जुगाराच्या विळख्यात ओढणारे मोठे जाळे कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तेलंगणातील महबूबनगर विभागात काही दलालांकडून नागरिकांना आलिशान गोवा सहलीचे प्रलोभन देत त्यांना कॅसिनो, मटका आणि इतर सट्टेबाजीत अडकवले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित दलालांकडून गोव्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि मौजमजेच्या नावाखाली आकर्षक सहल पॅकेजची जाहिरात केली जाते. या पॅकेजमध्ये आलिशान वाहनांतून प्रवास, निवास असल्याची माहिती पुढे आली आहे

पर्यटनासाठी शेती, घरे, दागिने पणाला

या प्रकारामुळे अनेक पर्यटकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. काहीजणांनी जुगारातील तोटा भरून काढण्यासाठी शेतजमीन, घरे आणि दागिने विकल्याचे सांगितले जात आहे. तर काहींनी कर्ज फेडण्यासाठी शेती गहाण ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसूनही सामाजिक बदनामीच्या भीतीने अनेक पीडित पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते.

online investment fraud arrested
Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

सीबीआय अधिकारी भासवून महिलेला १४ लाखांना फसविले

गोवा सायबर क्राइम पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील एका संशयिताला महाराष्ट्रातील सातारा येथून अटक केली आहे. योगेश कांतीलाल शाह (वय ४५ वर्षे, रा. खंडाळा, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.करंझाळे येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २७ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ०४/२०२६ नोंद करण्यात आला होता.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानुसार, १४ ते २२ जानेवारीदरम्यान आरोपींनी विविध ‘सिग्नल ॲप’ क्रमांकांचा वापर करून स्वतःला ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. तक्रारदाराच्या नावावर बंगळुरूमध्ये सुरू असलेले सीम कार्ड, आधार कार्ड आणि एटीएम कार्ड मानव तस्करी प्रकरणाशी जोडले असल्याचा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com