Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; बिहारच्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saligao police arrest POCSO case: साळगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
crime against minor in Goa
crime against minor in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: साळगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, महिला व बालसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आरोपी बिहारचा रहिवासी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला २२ वर्षीय संशयित आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत त्याने कृत्य केल्याची माहिती समोर आल्यानंतर साळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कसून तपास केला आणि आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या.

crime against minor in Goa
Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

न्यायालयीन कोठडीत रवानगी

आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीची रवानगी न्यायिक कोठडीत (Judicial Custody) केली आहे. संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह, अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

crime against minor in Goa
Goa weather: मान्‍सूनपूर्व पावसात 40 टक्‍क्‍यांनी वाढ; सलग दोन दिवस हजेरी, जनजीवन विस्‍कळीत

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचार प्रकरणात आणखी काही बाबी दडलेल्या आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. साळगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस भक्कम पुरावे गोळा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa POCSO Case
Supreme Court POCSO Case Goa
POCSO Case Goa
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com