Maharashtra Winter Assembly Session

Maharashtra Winter Assembly Session

Dainik Gomantak

Winter Assembly Session: महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये रंगणार सामना

भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शने करण्याची रणनितीही आखली आहे.
Published on

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आणि भाजपमध्ये (bjp) आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगताना दिसत आहे. आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter season maharashtra 2021) मुंबईत सुरू होते आहे. या अधिवेशनाच्या मुहूर्तावर भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात वेगवान घडामोडी घडण्याची मोठी शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीमुळे पुढे ढकलण्यात आलेले हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) आजपासून सुरू होते आहे. कोविड संसर्गाचा विचार करता नियमांचे पालन करून पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. आज अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शने करण्याची रणनितीही आखली आहे.

<div class="paragraphs"><p>Maharashtra Winter Assembly Session</p></div>
'जया बच्चन यांचा राग त्यांच्या मुलांवर काढला जातोय', संजय राऊतांची भाजपवर टीका

तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मूद्यांवरून भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार हे साळा आणे सत्य आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशिल असलेले 'शक्ती' विधेयक विधिमंडळात मांडणार आहे. या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरोधी पक्ष भाजप आमने सामने येणार.

याबरोबरच प्रलंबित असलेले 5 विधेयके आणि प्रस्तावित 21 विधेयकांचीही मांडणी विधिमंडळाच्या पटलावर होणार आहेत. या पाच दिवसांच्या अधिवेशनात 26 पैकी किती विधेयकं मंजूर होतात यावर महाविकास आघाडी सरकारचं यश अवलंबून असणार आहे.

<div class="paragraphs"><p>Maharashtra Winter Assembly Session</p></div>
आघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासला, फडणवीसांचा घणाघात

मात्र आज पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील उपस्थितीकडे. मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीरपणे राज्यासमोर येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी 9 वाजता होणाऱ्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com