'जया बच्चन यांचा राग त्यांच्या मुलांवर काढला जातोय', संजय राऊतांची भाजपवर टीका

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंब अंमलबजावणी संचालनालय-ईडीच्या रडारवर आहे.
Sanjay Raut allegation, Jaya Bachchan anger is being taken out on her family

Sanjay Raut allegation, Jaya Bachchan anger is being taken out on her family

Dainik Gomantak

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंब अंमलबजावणी संचालनालय-ईडीच्या रडारवर आहे. सोमवारी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिची दिल्लीतील ईडी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली. यावर खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. ऐश्वर्या रायच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'जया बच्चन यांच्याबद्दलची नाराजी केंद्र सरकार त्यांच्या कुटुंबीयांवर काढत आहे.'

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, 'जया बच्चन विरोधी पक्षांसोबत उभ्या आहेत. त्यांना पाठिंबा देत आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकार नाराज झाले. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ऐश्वर्यानंतर जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि इतर कुटुंबीयांनाही ईडीकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Sanjay Raut allegation, Jaya Bachchan anger is being taken out on her family</p></div>
Panama Papers case: ED ने केली ऐश्वर्याची 6 तास चौकशी

जया बच्चन राज्यसभेत मोदी सरकारवर भडकल्या

ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) ईडीची (ED) चौकशी सुरू असतानाच समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जया बच्चन बोलत असताना सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांनी गोंधळ घातला. यामुळे जया बच्चन संतापल्या.त्या म्हणाल्या, 'भाजपचे वाईट दिवस येणार आहेत. हा माझा शाप आहे.'

जया बच्चन पुढे म्हणाल्या, 'तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. तुम्ही चर्चा होऊ देऊ नये. घ्या आम्हा सगळ्यांची गळचेपी करा, तुम्हीच सभागृह चालवा. या सभागृहात आणि बाहेर बसलेल्या 12 सदस्यांचे तुम्ही काय करत आहात? आम्हाला न्याय हवा आहे. पण सत्तेत असलेल्यांकडून अशी अपेक्षा करता येत नाही.'' याशिवाय आपण काहीही ऐकत नसल्याचे सांगत जया बच्चन उपसभापती भुवरेश्वर कालिका यांच्यावरही संतापल्या. जया बच्चन एवढ्या संतापल्या की त्यांना बोलता बोलता श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com