World Table Tennis: हाँगकाँगच्या जोडीवर 3-2 ने मात करत मनिका-अर्चनाचा दुहेरीत रोमहर्षक विजय

निर्णायक पाचव्या गेममध्ये 10-10 अशी गुणबरोबरी असताना भारतीय जोडीने जिगरबाज खेळ करत दोन गुणांसह सामना जिंकून स्पर्धेतील उत्कंठावर्धक निकालाची नोंद केली.
World Table Tennis
World Table TennisDainik Gomantak
Published on
Updated on

किशोर पेटकर

World Table Tennis भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने अर्चना कामत हिच्यासह वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत बुधवारी रोमहर्षक विजय नोंदविला. महिला दुहेरीत 0-2 अशा पिछाडीवरून भारतीयांनी हाँगकाँगच्या जोडीला 3-2 असे पराजित केले.

स्पर्धा ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर सुरू आहे. हाँगकाँगच्या ली चिंग वॅन व झू चेंगझू जोडीने पहिले दोन गेम 11-8, 11-9 असे जिंकून उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल राखली होती. मात्र नंतर मनिका व अर्चनाने जबरदस्त मुसंडी मारली. पुढील दोन्ही गेम 11-5, 11-6 असे जिंकून भारतीय जोडीने 2-2 अशी बरोबरी साधली.

निर्णायक पाचव्या गेममध्ये 10-10 अशी गुणबरोबरी असताना भारतीय जोडीने जिगरबाज खेळ करत दोन गुणांसह सामना जिंकून स्पर्धेतील उत्कंठावर्धक निकालाची नोंद केली. स्पर्धेत मनिका व अर्चनाला महिला दुहेरीत द्वितीय मानांकन आहे.

World Table Tennis
Olive Ridley Turtles : आश्वे किनाऱ्यावरील कासव संवर्धन मोहिमेसाठी उच्च न्यायालयाचा 'हा' महत्वाचा निर्णय

मनिकाची घोडदौड

मनिकाने महिला एकेरीत एकतर्फी विजय नोंदविला होता. तिने इंग्लंडच्या टिन टिन हो हिच्यावर 3-0 (11-4, 11-8, 11-5) अशी मात केली. पहिल्याच गेममध्ये सलग नऊ गुण जिंकत मनिकाने इंग्लिश खेळाडूस डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. संध्याकाळच्या सत्रात मनिकाने जोरदार फॉर्म कायम राखताना साथियन ज्ञानशेखरनच्या साथी मिश्र दुहेरीतही विजयी कामगिरी साधली. भारतीय जोडीने लिम जाँगहून व शिन युबिन या कोरियाच्या जोडीवर 3-1 (11-7, 11-6, 3-11, 11-6) असे नमवून पुढील फेरीत प्रवेश केला.

World Table Tennis
Mapusa News: म्हापसा 'आरटीओ'चा सर्व्हर डाऊन; नागरिकांना मनस्ताप

हरमीतला साथियन भारी

पुरुष एकेरीत भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू साथियन ज्ञानशेखरन देशवासीय हरमीत देसाई याला भारी ठरला. पात्रता फेरीत सलग तीन लढतीत निर्णायक गेम जिंकून मुख्य फेरीत दाखल झालेल्या हरमीतला साथियनने 3-1 (11-4, 10-12, 13-11, 11-9) असे नमविले.

दुसरा गेम जिंकल्यानंतर हरमीतने तिसऱ्या गेमममध्ये साथियनला झुंजविले, पण नंतर चौथ्या गेममध्ये साथियनचा अनुभव भारी ठरला. हरमीतने दुहेरीत मानव ठक्करच्या साथीत देशवासीय जीत चंद्रा व रोनी भांजा जोडीवर चुरशीच्या लढतीत 3-2 (9-11, 11-8, 8-11, 11-6 , 11-5) अशी मात केली.

World Table Tennis
Goa Traffic Rule: सावधान! अटल सेतूवर वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता स्पीड रडारची नजर

भारतीयांचे अन्य निकाल

पुरुष दुहेरी:- अचंता शरथ कमल व साथियन ज्ञानशेखरन पराभूत वि. चो सेऊंगमिन व अॅन जेह्यून (कोरिया) 1-3). मानूष शाह व स्नेहित सुरावाजुला पराभूत वि. बास्तियन रँबे व ज्युल्स रोलाँ (फ्रान्स) 1-3.

महिला दुहेरी:- अहिका मुखर्जी व सुतिर्था मुखर्जी वि. वि. नतालिया बाजोर (पोलंड) व यूस्रा हेल्मी (इजिप्त)3-0. दिया चितळे व श्रीजा अकुला पराभूत वि. चेंग चिंग व लि यू झून (तैवान) 0-3 यशस्विनी घोरपडे व सुहाना सैनी पराभूत वि. किम नॅयोंग व जू चेओन्हूल 1-3.

मिश्र दुहेरी:- मानव ठक्कर व अर्चना कामत पराभूत वि. ली सँगसू व चोई ह्योजाओ (कोरिया) 1-3. वेस्ली दो रोझारियो व सुहाना सैनी पराभूत वि. इमॅन्यूएल लेबेसॉ व युअॅन जिया नॅन (फ्रान्स) 0-3.

पुरुष एकेरी:- पायस जैन पराभूत रिकार्डो वॉल्थर (जर्मनी) 0-3, वेस्ली दो रोझारियो पराभूत वि. इमॅम्युएल लेबेसॉ (फ्रान्स) 0-3.

महिला एकेरी:- श्रीजा अकुला पराभूत वि. हाना गोदा (इजिप्त) 1-3, यशस्विनी घोरपडे पराभूत वि. मियू नागासाकी (जपान) 0-3. सुतिर्था मुखर्जी वि. वि. सुहाना सैनी 3-1.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com