Olive Ridley Turtles : आश्वे किनाऱ्यावरील कासव संवर्धन मोहिमेसाठी उच्च न्यायालयाचा 'हा' महत्वाचा निर्णय

उकीयो बीच रिसॉर्टला लाऊडस्पिकर आणि चमकणाऱ्या लाईट्सचा वापर करण्यास उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलीय.
Olive Ridley
Olive RidleyDainik Gomantak
Published on
Updated on

Olive Ridley Turtles आश्वे, मोरजी हे समुद्र किनारे कासवांच्या घरट्यासाठी प्रसिद्ध असलेले समुद्र किनारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच वन आणि नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी हा भाग निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, अशी केंद्राकडे मागणी करणार असल्याची देखील माहिती दिली होती. त्याच विषयाला अनुसरून उच्च न्यायालयाने आश्वे- पेडणे येथील कासव संवर्धन परिसरात शांतता पाळण्याचे आदेश दिले आहेत.

आश्वे- पेडणे येथील कासव संवर्धन परिसरात असलेल्या उकीयो बीच रिसॉर्टला 20 मार्चपर्यंत लाऊडस्पिकर आणि चमकणाऱ्या लाईट्सचा वापर करण्यास उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलीय.

यंदाच्या जानेवारी महिन्यात आश्वे- मांद्रे येथील किनाऱ्यावर एक सागरी कासव अंडी घालण्यासाठी आले होते. परंतु किनाऱ्यावरील पर्यटक आणि नागरिकांचा गोंधळ, मोठ्या आवाजामुळे अखेर सागरी कासव अंडी न घालताच समुद्रात माघारी फिरल्याची घटना घडली होती.

Olive Ridley
Margao News: मडगाव येथील पार्किंगची जागा 'रेंट अ बाईक' वाल्याकडून हडप, नगरसेवकाचा आरोप

राज्यात ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत व्यवस्थापन आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना करण्यासाठी वन विभाग सक्रिय असल्याचे वन आणि नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी जाहिर केलंय.

तसेच मांद्रे समुद्र किनारी कासवाने अंडी दिल्यावर राणे यांनी संपूर्ण मोरजी समुद्र किनारा विकासासाठी निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com