Mapusa News: म्हापसा 'आरटीओ'चा सर्व्हर डाऊन; नागरिकांना मनस्ताप

3 दिवसांपासून इंटरनेट सेवा खंडीत
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

Mapusa News: म्हापसा आरटीओ कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट नसल्याने अनेक कामांमध्ये व्यत्यय आला असून नागरिकांचे नुसतेच हेलपाटे सुरू आहेत. अनेक नागरीक महत्वाच्या कामासाठी या कार्यालयात येतात पण इंटरनेटअभावी त्यांना सेवा मिळेनाशी झाली आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे कारण नागरिकांना सांगितले जात आहे.

Mapusa News
Mayem News: मयेत कळसोत्सवाला तणावाचे गालबोट; उत्सव अर्ध्यावर केला रद्द

अनेक नागरिक तर दिवसभर येथे सर्व्हरचा प्रॉब्लेम दूर होऊन काम होईल, या अपेक्षेत थांबले होते. पण त्यांचे काम पुर्ण झाले नाही. त्यांना हात हालवतच परत जावे लागले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे.

येथे आलेल्या नागरिकांना बसण्यासाठीही चांगली सोय नाही. त्यामुळे असुविधा आणि मनस्ताप सर्वसामान्यांच्या वाट्याला येत आहे.

Mapusa News
Pernem News: गोव्यातील 'या' गावात आता बारवर बंदी; यापुढे बारला परवानाही देणार नाही!

कार्यालयाकडून हा प्रॉब्लेम कधी निकालात निघणार आहे, याचीही माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे होल होतच राहणार आहेत. दरम्यान, याबाबत येथील अधिकाऱ्यांनी हा टेक्निकल विषय ही अडचण कधी दूर होईल, याबाबत काही सांगता येऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

मागे एकदा पुर्ण दिवस सर्व्हर डाऊन होता. नेटवर्क सकाळी होते, दुपानंतर नाही. हा तांत्रिक दोष आहे. आम्ही यात काही करू शकत नाही.

ही अडचण कधी दूर होईल, याबाबत काहीच खात्रीशीर सांगता येत नसल्याने नागरिकांना कधी दिलासा मिळणार, असा सवाल केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com