Goa Traffic Rule: सावधान! अटल सेतूवर वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता स्पीड रडारची नजर

गोव्यातील वाढते अपघात सत्र रोखण्यासाठी गोवा पोलीस आणि गोवा वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहे.
Speed Radar
Speed RadarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Rule गोव्यात सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अति घाई, वेग मर्यादेचे उल्लंघन, वाहतूक नियम न पाळणं या आणि अशा कित्येक कारणास्तव रोज किमान एक अपघात घडत आहे. तसेच या अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र गोव्यातील वाढते अपघात सत्र रोखण्यासाठी गोवा पोलीस आणि गोवा वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहे.

या संबंधी एका मोठी अपडेट समोर येतेय. पणजीतील अटल सेतूवर वाहन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा तपासण्यासाठी स्पीड रडार बसवण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवशी या कॅमेऱ्याची ट्रायल घेण्यात आली. यावेळी 3 हजार जणांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

Speed Radar
Mapusa News: म्हापसा 'आरटीओ'चा सर्व्हर डाऊन; नागरिकांना मनस्ताप

वाहतूक नियमांचां भंग करणाऱ्यांचा डाटा थेट त्यांच्या लायसन्सशी लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या गुन्ह्यांचे मोजमाप करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार संबंधित वाहनचालकावर कारवाईही करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातांस कारणीभूत ठरल्याचे दिसून आल्यास वाहतूक परवाना कायमचा निलंबित केला जाऊ शकतो अशी माहिती देखील या आधी पोलीस खात्याकडून देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com