कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

Roche Tecentriq Subcutaneous India: भारतातील कर्करोग रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. स्विस फार्मा दिग्गज कंपनी 'रोश'ने भारतात 'टेसेंट्रिक' या औषधाची सबक्युटेनियस आवृत्ती सादर केली.
7 Minute Cancer Treatment India
7 Minute Cancer Treatment IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

7 Minute Cancer Treatment India: भारतातील कर्करोग रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. स्विस फार्मा दिग्गज कंपनी 'रोश'ने भारतात 'टेसेंट्रिक' या औषधाची सबक्युटेनियस आवृत्ती सादर केली. विशेष म्हणजे, ज्या उपचारांसाठी रुग्णालयात तासनतास घालवावे लागायचे, ते उपचार आता अवघ्या 7 मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहेत. त्यामुळे फुफ्फुसाच्या विशिष्ट कर्करोगासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.

तासनतास चालणाऱ्या उपचारांपासून सुटका

यापूर्वी 2018 मध्ये टेसेंट्रिकची इंट्राव्हेनस (IV - शिरेवाटे दिली जाणारी) आवृत्ती लाँच करण्यात आली होती. मात्र, शिरेवाटे औषध देण्यासाठी बराच वेळ लागत असे. आता भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाने (CDSCO) या औषधाच्या सबक्युटेनियस आवृत्तीला मान्यता दिली. यामुळे उपचारांच्या वेळात सुमारे 80 टक्क्यांची घट होणार असून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जास्त वेळ घालवावा लागणार नाही. या औषधामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि रुग्णालयांवरील खाटांचा ताणही कमी होण्यास मदत होईल.

7 Minute Cancer Treatment India
Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण

ग्लोबोकॅन (GLOBOCAN) 2022 च्या आकडेवारीनुसार, भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 81,478 रुग्ण आढळले असून 75,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. एकेकाळी हा आजार केवळ धूम्रपान करणाऱ्यांमध्येच आढळत असे, परंतु आता वाढत्या वायू प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने पसरत आहे. सध्या हा आजार भारतातील चौथा सर्वात सामान्य कर्करोग ठरला.

7 Minute Cancer Treatment India
दिवाळीच्या धामधुमीत आरोग्य विसरू नका! Heart Patientsनी मिठाईपासून कसे वाचावे?

इम्युनोथेरपी आणि त्याचे महत्त्व

टेसेंट्रिक ही एक प्रकारची 'इम्युनोथेरपी' आहे. केमोथेरपीमध्ये शरीरातील सर्व वेगाने वाढणाऱ्या पेशींवर हल्ला केला जातो, ज्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, इम्युनोथेरपी रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण देते. यामुळे ही पद्धत अधिक सुरक्षित मानली जाते. 'अ‍ॅटेझोलिझुमॅब' हा या औषधातील मुख्य घटक असून तो शरीरात वेगाने शोषला जाण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

7 Minute Cancer Treatment India
Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

किंमत आणि उपलब्धता

या आधुनिक औषधाची किंमत प्रति वायल (vial) सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे. सामान्यतः एका रुग्णाला पूर्ण उपचारांसाठी सहा सायकलची आवश्यकता असते. औषधाची किंमत जास्त असली तरी कंपनी आपल्या पेशंट ऍक्सेस प्रोग्रामच्या माध्यमातून रुग्णांना काही प्रमाणात आर्थिक सवलत उपलब्ध करुन देत आहे. 85 देशांमध्ये मान्यताप्राप्त असलेले हे जगातील पहिले औषध आहे जे शिरेवाटे आणि त्वचेखाली अशा दोन्ही प्रकारे दिले जाऊ शकते.

7 Minute Cancer Treatment India
Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

तज्ज्ञांचे मत

प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सज्जन राजपुरोहित यांच्या मते, भारतातील 50-60 टक्के फुफ्फुसाच्या कर्करोग रुग्णांना या उपचाराचा फायदा होऊ शकतो. तसेच, मनिपाल हॉस्पिटलचे डॉ. अमित राऊथन यांनी सांगितले की, भारताचा वाढता कर्करोगाचा भार पाहता अशा कमी वेळ घेणाऱ्या उपचार पद्धती अधिक सोयीस्कर आणि परिणामकारक ठरतील. रोशचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवबालन शिवनेसन यांनी स्पष्ट केले की, आधुनिक कर्करोग उपचार केवळ रुग्णाला वाचवण्यापुरते मर्यादित नसून, त्यांचे जीवन सुसह्य करण्यावरही भर देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com