Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

Health Tips: हृदयविकाराचा झटका हा नेहमी पुरुषांनाच येतो असं आपण अनेकदा समजतो. मात्र, हृदयविकाराचा धोका महिलांमध्येही तितकाच कधी कधी अधिकच असतो.
Women Heart Attack
Women Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

हृदयविकाराचा झटका हा नेहमी पुरुषांनाच येतो असं आपण अनेकदा समजतो. मात्र, हृदयविकाराचा धोका महिलांमध्येही तितकाच कधी कधी अधिकच असतो. फरक इतकाच की, महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगळी, सौम्य आणि अनेकदा गोंधळात टाकणारी असतात. टीव्हीवरील जाहिरातींमध्ये जसं छाती पकडून पडणं दाखवलं जातं, तसं बहुतेक वेळा महिलांमध्ये घडत नाही. त्यांच्यातील लक्षणे हळूहळू आणि अस्पष्ट स्वरूपात दिसतात. यामुळे त्यांना योग्य उपचार मिळण्यास उशीर होतो, आणि त्यामुळे जीवावर बेतू शकतं.

महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे वेगळी का असतात?

महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल, शरीररचना आणि जीवनशैलीतील फरक यामुळे त्यांची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. कधी कधी, हृदयात मोठा अडथळा नसतानाही लहान रक्तवाहिन्यांमध्ये ताण किंवा सूज निर्माण होते.

त्यामुळे छातीत वेदना न येता जबडा, पाठ, मान किंवा खांद्यात वेदना जाणवू शकतात. काही महिलांमध्ये “स्पॉन्टेनिअस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन” (SCAD) नावाची स्थिती दिसते, जी प्रसूतीनंतरच्या काळात अधिक आढळते.

हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे

  • अत्यधिक थकवा किंवा अशक्तपणा: काहीही कठीण काम न करता थकवा जाणवत असेल किंवा विश्रांतीनंतरही अशक्तपणा टिकून असेल, तर ते हृदयातील रक्तपुरवठा कमी झाल्याचं लक्षण असू शकतं.

  • श्वास घेण्यास त्रास: अगदी चालताना, जिना चढताना किंवा शांत बसल्यावरही श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर हे हृदयविकाराचं संकेत असू शकतं.

Women Heart Attack
Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
  • जबडा, मान, खांदा, पाठ किंवा हात दुखणे: या भागांतील वेदना अनेकदा स्नायू किंवा ताणामुळे आहेत असं समजलं जातं, पण त्या हृदयाच्या तक्रारीचे सूचक असू शकतात.

  • पोटात जळजळ, उलट्या किंवा अपचन: अनेकदा या तक्रारींना गॅस किंवा आम्लता समजलं जातं, पण हृदयविकाराच्या झटक्याची ही सौम्य लक्षणं असू शकतात.

  • अचानक घाम येणे किंवा अस्वस्थता जाणवणे: थंड, चिकट घाम येणे, अस्पष्ट चिंता किंवा बेचैनी हेही गंभीर संकेत आहेत.

  • झोपेचा त्रास आणि अस्वस्थ झोप: वारंवार रात्री जाग येणं, झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवणं हेही शरीराकडून दिलेले धोक्याचे इशारे आहेत.

Women Heart Attack
Winter Health Tips: हिवाळ्यात 'मोसंबी ज्यूस' पिण्याचे 8 अद्भुत फायदे; दिवसभर राहाल तजेलदार

तपासणी का आवश्यक?

महिलांनी आपल्या शरीराकडून येणारे छोटे संकेत दुर्लक्षित करू नयेत. नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या बाबतीत "वेळ म्हणजे जीवन" कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला वरील लक्षणांपैकी कोणतेही जाणवत असतील, तर तात्काळ हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com