Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

What Is Silent Heart Attack: बदलती जीवनशैली, वाढता तणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
Smoking Vs Alcohol Heart Damage
Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

What Is Silent Heart Attack: बदलती जीवनशैली, वाढता तणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 1.8 कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो, ज्यात एक तृतीयांश प्रकरणे हृदयविकाराच्या झटक्याची असतात. विशेषतः, अलीकडच्या काळात 'सायलेंट हार्ट अटॅक' (Silent Heart Attack) म्हणजेच स्पष्ट लक्षणे न दिसणारा हृदयविकाराचा झटका एक नवी आणि गंभीर समस्या बनून समोर आला आहे.

डॉक्टरांच्या मते, याला 'सायलेंट' हृदयविकार म्हणण्याचे कारण हे आहे की, यामध्ये रुग्णाला सामान्य हार्ट अटॅकसारखी छातीत तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवत नाही. हा हल्ला अगदी शांतपणे होतो आणि अनेकदा हृदयाचे मोठे नुकसान होईपर्यंत त्याचे निदान होत नाही.

Smoking Vs Alcohol Heart Damage
Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

सायलेंट हार्ट अटॅकची कारणे आणि धोका

सायलेंट हार्ट अटॅकचे मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट जमा होणे, ज्यामुळे रक्ताभिसरण थांबते. उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), धूम्रपान, जास्त ताण आणि असंतुलित आहार ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

तज्ञांच्या मतानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे अधिक अस्पष्ट असतात, ज्यामुळे निदान होण्यास विलंब होतो. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक, मधुमेहाचे रुग्ण आणि शारीरिकरित्या कमी सक्रिय लोक या स्थितीचे बळी होण्याची शक्यता जास्त असते. सततचा थकवा, पुरेशी झोप न मिळणे आणि तीव्र मानसिक ताण देखील याला बळ देतात. हा हल्ला हळूहळू हृदयाच्या स्नायूंना (Muscles) नुकसान पोहोचवून गंभीर हृदयरोगात रुपांतरित होऊ शकतो.

Smoking Vs Alcohol Heart Damage
Heart Attack: तुमच्याही पायांवर दिसतायत ही लक्षणं? वेळीच व्हा सावध; नाहीतर कधीही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका!

असामान्य लक्षणे कशी ओळखावीत?

राजीव गांधी हॉस्पिटलमधील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अजित जैन सांगतात की, सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे खूप सौम्य किंवा असामान्य असल्याने लोक त्यांना अनेकदा ऍसिडिटी किंवा गॅस समजून दुर्लक्ष करतात.

सायलेंट हार्ट अटॅकची संभाव्य लक्षणे

  • छातीत हलका दबाव किंवा जळजळ जाणवणे (जी सामान्यतः ऍसिडिटीसारखी वाटते).

  • पाठ, मान, जबडा किंवा खांद्यांमध्ये हलके दुखणे.

  • धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.

  • अचानक थकवा येणे किंवा झोपेत अडचण येणे.

  • काहीवेळा जास्त घाम येणे, मळमळ किंवा गोंधळल्यासारखे वाटणे हे देखील लक्षण असू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वेदनेची जाणीव कमी झाल्यामुळे हा झटका वेदनांशिवाय देखील येऊ शकतो. त्यामुळे जर शरीरात वारंवार अशा समस्या येत असतील, तर त्याकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करु नका. ईसीजी (ECG) किंवा डॉक्टरांच्या वेळेवर तपासणीमुळे या गंभीर धोक्याला ओळखणे शक्य होते.

Smoking Vs Alcohol Heart Damage
Heartburn Or Heart Attack: छातीत होणारी जळजळ आणि हृदयविकाराचा झटका यात काय फरक असतो? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

सायलेंट हार्ट अटॅकपासून बचाव कसा करावा?

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि सायलेंट हार्ट अटॅक टाळण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.

  1. नियमित तपासणी: आपला रक्तदाब आणि साखर (Sugar) पातळी नियमित तपासा.

  2. व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा वेगाने चालणे गरजेचे आहे.

  3. आहार: तळलेले आणि गोड पदार्थ टाळून संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.

  4. व्यसन सोडा: धूम्रपान आणि दारुचे सेवन पूर्णपणे बंद करा.

  5. विश्रांती: पुरेशी झोप घ्या आणि मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com