गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबच आहाराच्या सवयी देखील बदलल्या आहेत. आहाराच्या चुकीच्या सवयी हृदयाच्या (Heart) आरोग्यास घातक ठरत असून आपल्या रोजच्या आहारात काय बदल करावेत हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च सोडियमयुक्त आहारामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांनी सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या आहार घ्यावा. हृदयविकार असलेल्या लोकांसाठी सोडियमचे सेवन हे दररोज 2,000 मिलीग्रामपेक्षा कमी असावे.
· हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की फ्रोजन फूड, मीट, हवाबंद डब्यातील सूप, रेडी टु कुक पास्ता, सॅलड ड्रेसिंग इतर मसाल्यांचे सेवन मर्यादित करा.
· प्री-पॅकेज केलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खरेदी करताना, पोषण लेबले वाचण्याची खात्री करा. शक्य असल्यास लो सोडियमयुक्त खाद्यपदार्थांची निवड करा.
· स्वयंपाक करताना मिठाच्या प्रमाणावर मर्यादा आणा. चवीसाठी लिंबूचा रस, मसाले, औषधी वनस्पती आणि इतर सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या घटकांचा वापर करा.
यामध्ये शरीराला आवश्यक असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर आवश्यक पोषकतत्वांनी समृद्ध असलेले आहाराचे समावेश असणे आवश्यक आहे. जास्त कॅलरीज आणि पोषणमूल्य कमी असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे योग्य राहिल.
मटण, मिठाई आणि ट्रान्स-फॅट, सॅच्युरेटेड फॅट, सोडियम, कोलेस्टेरॉल किंवा रिफाईंड शुगरचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा वापर करणे टाळा. मर्यादेपेक्षा जास्त द्रव पदार्थांचे सेवन टाळा. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये, जास्त प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन हे रक्तदाब वाढीचे कारण ठरु शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. दररोज किती पाणी प्यावे याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ किंवा औषधं जी शरीराला अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात त्यांचा वापर हृदयरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.
मद्यपानाचे व्यसन टाळा
मद्यपानाचे व्यसन टाळल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत होईल. अति मद्यपानाने स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका तसेच इतर आजारांचा धोका वाढू शकतो.
कॅलरीजचे प्रमाण कमी करा, पोषकतत्वांनी युक्त अन्नाचे सेवन करा
तुमच्या हृदयावरील ताण कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी आहारात नेहमीपेक्षा कमी कॅलरीजच् सेवन आवश्यक आहे. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी करा आणि पोषकतत्वांनी युक्त अन्नाचे सेवन करा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांसाठी पोषक तत्वांनी युक्त आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या उपचारासाठी पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हार्ट फेल्युअरच्या निदानानंतर डॉक्टर मीठ, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ, अल्कोहोल, फास्ट फूड आणि जंक फूड वापर न करण्याचा सल्ला देतात.आहारात अचूक बदल करण्यासाठी आहारतज्ञांची मदत घ्या.
(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.