New Year 2023: नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्याची घ्या काळजी, 'या' गोष्टी करा फॉलो

New Year 2023: नव्या वर्षात जंक फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे.
New Year 2023| New Year Health Care | New Year Fitness care
New Year 2023| New Year Health Care | New Year Fitness care Dainik Gomantak
Published on
Updated on

New Year 2023 : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांचा उत्साह आणि जल्लोष आहे. नवीन वर्षाचे स्वागत करायचे म्हटले की त्यात पार्टी तो बनतो है! जर तुम्ही पार्टी करून नवीन वर्षाचे स्वागत करणार असाल तर लक्षात घ्या ही पार्टी हेल्दी असावी. तुमचा आनंद आणि तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही पद्धतींचा पार्टीचा आनंद लुटू शकता.

आजकाल पार्टीत जंक फूड आणि हेव्ही फूडचा वापर केला जातो. सकस आहार (Healthy Food) म्हणजे चवीशी तडजोड करणे असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तुमच्या चवीबरोबरच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मेनूमध्ये कोणत्या गोष्टी असावा हे जाणून घेउया.

कोल्ड्रिंक्स, कॉकटेल इत्यादींमध्ये कॅलरीज जास्त असतात. या ऐवजी तुम्ही फ्रूट पंच, फळांचा रस, सूप, शेक किंवा मॉकटेल्स निवडू शकता.

तळलेले पनीर, कबाब इत्यादींऐवजी स्टार्टर्स खा.

मुख्य कोर्समध्ये खूप तेलकट आहार टाळा. मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाच्या रोट्या, भाकरीचे सेवन करावे.

सॅलड आणि फळांचा (Fruits) अधिकाधिक वापर करा.

हिवाळ्यात (Winter) उत्सव साजरा करण्यासाठी बोनफायरभोवती नृत्य आणि खेळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. डान्समुळे पार्टीत एक वेगळी रंगत तर येतेच पण चांगला व्यायामही होतो. त्यामुळे पार्टीत डान्स नक्की करा. तसेच, शारीरिक हालचालींशी संबंधित खेळ निवडा.

New Year 2023| New Year Health Care | New Year Fitness care
Vinayaka Chaturthi: विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'या' 4 राशींवर राहिल श्रीगणेशाची कृपा
  • हिवाळ्यात घ्यावी विशेष काळजी

नवीन वर्ष (New Year) साजरा करण्यासाठी मित्रांबरोबर पार्टी करत असाल तर उबदार कपड्यांची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यातील ड्रेसमध्ये तुम्ही आणखी स्टायलिश आणि सुंदर दिसता. आजकाल फॅशनसाठी (Fashion) लोक हिवाळ्यातही उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. हिवाळ्यात तुम्हाला न्यूमोनिया आजार होउ शकतो. त्यामुळे तुम्ही थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच निरोगी राहाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com