राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मते फुटणार?

बंडनाट्य : दबाव टाळण्यासाठीच काँग्रेसचे पाच आमदार चेन्नईला
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेस आमदारांवर सतत येत असलेला दबाव टाळण्यासाठी पाच ‘निष्ठावान’ आमदारांना सुरक्षितस्थळी चेन्नईला नेण्यात आले आहे. युरी आलेमाव, संकल्प आमोणकर, एल्टन डिकॉस्ता, रुडॉल्फ फर्नांडिस आणि कार्लुस फेरेरा यांना शुक्रवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर तातडीने चेन्नईला रवाना करण्यात आले.

(Will votes be split in the presidential election)

Goa Congress
राज्यात पावसाचा कहर सुरूच!

दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या संपर्कात असलेले सहाजण माघारी फिरणे आता शक्य नाही, या निष्कर्षावर काँग्रेस आली आहे. राहिलेल्या पाचजणांना तरी फुटण्याच्या दबावातून दूर ठेवावे, या हेतूने काल संध्याकाळीच आमदारांना चेन्नईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदारांवर फुटण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संध्याकाळी गिरीश चोडणकर यांनी ट्विट करून काँग्रेस आमदारांवर पोलिसांचा ‘पहारा’ ठेवण्यात आल्याची टीका केली होती. ‘गोमन्तक’ने आज काही आमदारांशी संपर्क साधला असता त्यांनी याचा इन्कार केला. सूत्रांच्या मते, दिगंबर कामत आणि मायकल लोबो हे सतत काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्षाशी

एकनिष्ठ असलेले संकल्प आमोणकर आणि कार्लुस फेरेरा यांच्याशी त्यांनी सतत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘दोन आमदार गळाला लागले तर शुक्रवारी विधानसभा अधिवेशन चालू असतानाच आठ जणांचा वेगळा गट करून सभापतींना तसे पत्र देण्याचा प्रयत्न चालला होता. त्यामुळे या पाचही आमदारांना गोव्यातून दूर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला,’ अशी माहिती काँग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली.

कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर कामत यांनी निष्ठावंतांच्या गटाशी सतत संपर्क राखला होता.

Goa Congress
गोवा फुटबॉलमध्ये पाच बदली खेळाडू - GFA

विधिमंडळ पक्ष नेतेपदावरूनही कुरघोडी

दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षातील विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या स्पर्धेत कार्लुस फेरेरा आघाडीवर असले तरी संकल्प आमोणकर यांचा पत्ता पुढे केला जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत मते फुटली जाऊ नयेत, यासाठी एक गट प्रयत्न करत असून, संकल्प आमोणकर यांना नेतेपदी नेमल्यास काँग्रेसची निष्ठावंतांची पाच मते अबाधित राहतील, असा दावा ते करतात.

निवडणुकीत चित्र स्पष्ट

कॉंग्रेस पक्षाबरोबर असलेल्या आमदारांचा कल समजून घ्यायचा असेल तर त्यांना चेन्नईला नेऊन नव्हे, तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत किती मते फुटतात, यावरून स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसच्या एकूण ११ सदस्यांपैकी सहा मते भाजपच्या बाजूने पडतील, हे नक्की आहे. त्याशिवाय आणखी मते फुटली तर कॉंग्रेसचा ‘निष्ठावान’ गटही अभेद्य नाही, हे दिसून येणार आहे. तसे घडले तर आठजणांचा गट कॉंग्रेसला भगदाड पाडून लवकरच भाजपमध्ये शिरेल, हे स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com