गोवा फुटबॉलमध्ये पाच बदली खेळाडू - GFA

नवा मोसम: 15 ऑगस्टपासून लढतींना सुरवात, पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सामने
Goa Football News
Goa Football NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) कार्यकारी समितीने यंदापासून राज्य फुटबॉलमधील सामन्यात पाच बदली खेळाडू नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. दोन वर्षांनंतर 2022-23 मोसम संपूर्ण स्वरुपात होईल. स्पर्धात्मक लढतींना 15 ऑगस्टपासून सुरवात होईल आणि सामने पुढील वर्षी मे महिनाअखेरपर्यंत खेळले जातील. ( Goa Football Association has decided to implement 5 substitute rule in state football matches )

Goa Football News
वास्कोला 75 मीटरची जेटी मिळवून देणार - मंत्री निळकंठ हळर्णकर

कोविडमुळे 2020-21 व 2021-22 मोसमात प्रथम, द्वितीय व तृतीय विभागीय, तसेच वयोगट फुटबॉल स्पर्धा खेळविण्यात आल्या नव्हत्या. येत्या 15 ऑगस्टला गतवेळचा प्रो-लीग विजेता धेंपो स्पोर्टस क्लब व उपविजेता साळगावकर एफसी या संघांतील मदतनिधी सामन्याने नव्या मोसमात सुरवात होईल. हा सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर संध्याकाळी चार वाजता होईल.

प्रो-लीग स्पर्धा 10 सप्टेंबरपासून खेळली जाईल. राज्यातील ही प्रमुख स्पर्धा नऊ महिने चालेल, स्पर्धेचा समारोप 31 मे रोजी होईल. संबंधित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्लबना आवश्यक शुल्क 6 ऑगस्टपर्यंत भरावे लागेल, तसेच क्लबने उशिरा शुल्कासह नोंदणीचे नूतनीकरण 25 जुलैपर्यंत करावे लागेल.

Goa Football News
वाडी,शिवोली येथील घरफोडी प्रकरणी 5 जणांना अटक

कोविडमुळे खेळाडूंच्या आरोग्यसुरक्षा कारणास्तव आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळाने (आयएफएबी) मे 2020 मध्ये फुटबॉल सामन्यांसाठी तीन बदली खेळाडूऐवजी पाच बदली खेळाडूंचा तात्पुरता नियम केला होता. हा नियम कायम ठेवण्यास आता मंडळाने सहमती दर्शविली आहे.

फुटसाल, बीच फुटबॉल स्पर्धा

जीएफएने 2022-23 मोसमातील वेळापत्रकात फुटसाल आणि बीच फुटबॉल स्पर्धेचाही समावेश केला आहे. फुटसाल स्पर्धा 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. बीच फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये होईल. याशिवाय 14आणि 16 वर्षांखालील मुलांसाठी, तसेच 14वर्षांखालील मुलींसाठी साखळी स्पर्धाही घेण्यात येईल.

राज्य फुटबॉल 2022-2023 वेळापत्रक

- तासा गोवा 20 वर्षांखालील प्रथम व द्वितीय विभागीय : 16 ऑगस्ट ते ९ सप्टेंबर

- फुटसाल अजिंक्यपद स्पर्धा : 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर

- तृतीय विभागीय साखळी : 16 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर

- 18 वर्षांखालील प्रथम व द्वितीय विभागीय साखळी : 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर

- महिला लीग : 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर

- मदत निधी सामना : 15 ऑगस्ट

- गोवा प्रोफेशनल लीग : 10 सप्टेंबर ते 31 मे

- द्वितीय विभागीय साखळी : 1 नोव्हेंबर ते 15 जानेवारी

- प्रथम विभागीय साखळी : 16 जानेवारी ते 30 एप्रिल

- 14व 16 वर्षांखालील प्रथम-द्वितीय विभागीय : 17 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर

- 14वर्षांखालील मुली साखळी : 17 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर

- बीच फुटबॉल स्पर्धा : एप्रिल 2023

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com