बोगमाळो रंगवी इस्टेट येथे गुरुवारी गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या शैलेश गुप्ता(29) व शिवम सिंग(22) (उत्तर प्रदेश) दोन्ही संशयितांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. आज त्यांना प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले असता सात दिवस आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. मोठ्या प्रमाणात केलेल्या पोलीस शोध मोहिमेत दोन्ही संशयितांना कासावली येथे पकडण्यात पोलिसांना यश आलं. पैसे घेऊन हा खून केला असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशमधील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली. पुढील तपास पोलिस करीत असून लवकरच आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
सदर प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोर सापडले आहे. त्यावरून तपास करत आहे. शुक्रवारी पहाटे संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केली.सदर आरोपी यापुर्वी ८ व ९ जुलै रोजी घटनास्थळी येऊन गेल्याचे सांगितले.त्यानूसार त्यांनी कट रचिला असल्याचे त्यांनी सांगितले.आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याचे ते म्हणाले. मृतदेहाची चिकित्सा करण्यात आली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
प्रॉपर्टी डीलिंग करण्याचा बहाणा करून बोलावून बोगमाळो रंघवी इस्टेटमध्ये नवेवाडे वास्को येथील काल अमर नाईक यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात जखमी झालेल्या अमर नाईकला उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात नेत असतांनाच मृत घोषित करण्यात आले. सदर गोळी इंग्रजी पिस्तूल मधून झाडण्यात आली. (Two accused in Amar Naik shooting case were arrested within 12 hours)
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेतीन वाजता सदर घटना घडली. अमर नाईक 35 हा नवे वाडे येथे राहणार असून त्याला दुपारी बोगमाळो रंगवी इस्टेट येथे एका बंगल्याच्या प्रॉपर्टी डीलिंगसाठी एकाचा फोन आला त्यानुसार तो आपला मित्र प्रतिक घाडी याच्या समवेत इनोवा (जीए 06 झिरो सिक्स डे या कारमधून गेले व त्यानुसार त्यांनी प्रोपर्टी डीलिंग साठी आलेल्या बरोबर बोलणे करून ते परत घरी येण्यासाठी परतत असताना त्या दोघांनी आपण दारू आणलेली आहे ती तुमच्या गाडीत बसून पिऊ असे सांगून ते नाईक यांच्या गाडीत बसले आणि आपल्या खिशातील पिस्तूल काढून अमर नाईक याच्या डोक्यावर रोखले व उसंत न करता गोळी झाडली.
या अमर नाईक यांचा डोक्याचा चेंदामेंदा होऊन गोळी आज शिरली. यावेळी अमर नाईक याचा मित्र प्रितेश याच्यावर पिस्तोल रोखले असता प्रसंगावधान राखून रितेशने आपले हात झटकले व त्यांना ढकलले असता दोघेही गाडीमधून बाहेर निघून पळून गेले. त्यांनी आपली गाडी चालू करून पळण्याच्या वाटेवर असताना त्यांची गाडी एका झाडीत कोसळली. यावेळी त्यांनी गाडी तेथेच सोडून ते पळून गेले. सदर गाडी बार्देश येथे रजिस्टर असून गाडी मालकाचा पत्ता लागला आहे. त्यांच्याशी चौकशी सुरू आहे. त्यानंतर प्रितेश याने अमर नाईक याच्या भावाला व आपल्या मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले व अमरला रुग्णवाहिकेतून चिखली इस्पितळात आणण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
अमर नाईक याचा 22 जुलै रोजी वाढदिवस होता यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला असल्याचे सांगून त्याच्या बहिणीने हंबरडा फोडला. यावेळी त्याचे दोघे भाऊ हजर होते. दरम्यान दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.आरोपीना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगून याविषयी तपास चालू असल्याचे सांगितले. तसेच ठसेतज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.