Goa: मुरमुणेजवळ रगाडा नदीत टिप्पर ट्रक कोसळला

संरक्षक भिंत बांधण्याची नागरीकांची मागणी,ज्या ठिकाणी आज अपघात घडला त्या ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे त्यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनांना जागा देताना वाहनचालकांना खूप कष्ट घ्यावे लागतात.
मुरमुणेजवळ एका वळणावर समोरील वाहनाला बाजू देताना रगाडा नदीत कोसळलेला टिप्पर ट्रक
मुरमुणेजवळ एका वळणावर समोरील वाहनाला बाजू देताना रगाडा नदीत कोसळलेला टिप्पर ट्रकप्रेमानंद नाईक
Published on
Updated on

गुळेली: गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मुरमुणेजवळ एक टिप्पर ट्रक (Tipper truck) रगाडा नदीत (River Ragada) कोसळला असून सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुरमुणे भागातून गुळेलीच्या दिशेने एक चिरेवाहू टिप्पर ट्रक येत असताना मुरमुणे पुढील म्हारवाड पोहोचण्या पूर्वी एका वळणावर समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाला बाजू देताना रस्त्याकडेला रुतला आणी हळूहळू क्लिनरच्या बाजूने कलंडून थेट रगाडा नदीत कोसळला. यातील एक पलटी होऊन ट्रक रगाडा नदीत असलेल्या कणकिच्या झाडांवर स्थिरावला. आज जरा पावसाने उसंत घेतल्यामुळे रगाडा नदीच्या पाण्याला तेवढा जोर नव्हता नाहीतर पाण्याबरोबर हा ट्रक वाहून गेला असता.ट्रक मधील चिरे पूर्णपणे पिण्यात गेले.सुदैवाने हळूहळू ट्रक उलटला म्हणून आतील माणसांना बाहेर उड्या मारता आल्या आणि मोठा अनर्थ टळला असे याठिकाणी नागरीक बोलताना आढळले.

मुरमुणेजवळ एका वळणावर समोरील वाहनाला बाजू देताना रगाडा नदीत कोसळलेला टिप्पर ट्रक
Goa: पावसामुळे केळावडे पुलाचा रस्ता खचला, त्वरित दुरुस्तीची मागणी

रस्ता खूपच अरुंद

ज्या ठिकाणी आज अपघात घडला त्या ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे त्यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनांना जागा देताना वाहनचालकांना खूप कष्ट घ्यावे लागतात.दरम्यान रगाडा नदीच्या कडा या ठिकाणी कोसळत असून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची नितांत गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुळेलीहून सुरु होणारा रस्ता मुरमुणे,पैकूळ,धडा, शेळ,मैगींणे तसेच पुढे धारबांदोडा तालुक्यातील ओडकरवाडा साकोर्डा भाग जोडता त्यामुळे तसा हा रस्ता महत्वपूर्ण मानला जातो.काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी दरड कोसळली होती त्यामुळे हा रस्ता अधिक अरुंद झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com