Goa: आधी सुविधा उपलब्ध करा, नंतरच ऑनलाईन शिक्षण- ढवळीकर

विद्यार्थ्यांना अगोदर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नंतरच सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा (Online learning) विचार करावा.
Deepak Dhavalikar
Deepak DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: विद्यार्थ्यांना अगोदर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नंतरच सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा (Online learning) विचार करावा. अशी मागणी मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी केली आहे. सरकारला शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांचे काहीच पडलेले नाही. अशी टीकाही त्यांनी केली. ऑनलाईन शिक्षणातील समस्यांसंदर्भात शुक्रवारी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर (Bicholim Deputy Collector Deepak Waingankar) यांना निवेदन दिल्यानंतर श्री. ढवळीकर पत्रकारांकडे बोलत होते.

'कोविड'महामारीमुळे (Covid 19) ऑनलाईन शिक्षण सुरु असले, तरी आजही विद्यार्थी आणि पालकांसमोर अनेक समस्या आहेत. बहूतेक भागात नेटवर्कची समस्या आहे. अनेक मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. कामधंदा नसल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्यांना स्मार्टफोन घेवून देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित होत आहेत. असे श्री. ढवळीकर म्हणाले. विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध नाहीत, तर मग ऑनलाईन शिक्षणाचा फायदा तरी काय होणार, असा प्रश्न दिपक ढवळीकर यांनी उपस्थित केला.

Deepak Dhavalikar
Goa: डिचोली येथे मगरीला अखेर जीवनदान...

सध्या ऑनलाईन शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली असली, तरी सरकारने आधी या समस्या दूर कराव्यात. नंतरच ऑनलाईन शिक्षण सुरु करावे. अशी मागणीही त्यांनी केली. सध्याची ऑनलाईन शिक्षणाची पद्धत पाहता, भविष्यात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार. अशी भिती नरेश कडकडे यांनी व्यक्त केली. यावेळी मगो पक्षाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com