Goa Crime: कारमध्येच साधला डाव आणि अमरच्या डोक्यात घातली गोळी

गोळीबारात (Goa Crime) जखमी झालेल्या अमर नाईक याला उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

प्रॉपर्टी डीलिंग करण्याचा बहाणा करून बोलावून बोगमाळो रंघवी इस्टेटमध्ये नवेवाडे वास्को येथील अमर नाईक (Amar Naik) (35) याच्या डोक्यात गोळी (Goa Crime ) झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात जखमी झालेल्या अमर नाईक याला उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. सदर गोळी इंग्रजी पिस्तूल मधून झाडण्यात आली. आरोपी फरार असून पोलिस तपास चालू आहे. घटनास्थळी तसेच इस्पितळात दक्षिण गोवा अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस करीत आहे. (Goa Crime: Amar Naik from Goa was shot dead)

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेतीन वाजता सदर घटना घडली. अमर नाईक 35 हा नवे वाडे येथे राहणार असून त्याला दुपारी बोगमाळो रंगवी इस्टेट येथे एका बंगल्याच्या प्रॉपर्टी डीलिंगसाठी एकाचा फोन आला त्यानुसार तो आपला मित्र प्रतिक घाडी याच्या समवेत इनोवा (जीए 06 झिरो सिक्स डे या कारमधून गेले व त्यानुसार त्यांनी प्रोपर्टी डीलिंग साठी आलेल्या बरोबर बोलणे करून ते परत घरी येण्यासाठी परतत असताना त्या दोघांनी आपण दारू आणलेली आहे ती तुमच्या गाडीत बसून पिऊ असे सांगून ते नाईक यांच्या गाडीत बसले आणि आपल्या खिशातील पिस्तूल काढून अमर नाईक याच्या डोक्यावर रोखले व उसंत न करता गोळी झाडली. या अमर नाईक यांचा डोक्‍याचा चेंदामेंदा होऊन गोळी आज शिरली. यावेळी अमर नाईक याचा मित्र प्रितेश याच्यावर पिस्तोल रोखले असता प्रसंगावधान राखून रितेशने आपले हात झटकले व त्यांना ढकलले असता दोघेही गाडीमधून बाहेर निघून पळून गेले. त्यांनी आपली गाडी चालू करून पळण्याच्या वाटेवर असताना त्यांची गाडी एका झाडीत कोसळली.

यावेळी त्यांनी गाडी तेथेच सोडून ते पळून गेले. सदर गाडी बार्देश येथे रजिस्टर असून गाडी मालकाचा पत्ता लागला आहे. त्यांच्याशी चौकशी सुरू आहे. त्यानंतर प्रितेश याने अमर नाईक याच्या भावाला व आपल्या मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले व अमरला रुग्णवाहिकेतून चिखली इस्पितळात आणण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आला.

अमर नाईक याचा 22 जुलै रोजी वाढदिवस होता यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला असल्याचे सांगून त्याच्या बहिणीने हंबरडा फोडला. यावेळी त्याचे दोघे भाऊ हजर होते. दरम्यान दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.आरोपीना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगून याविषयी तपास चालू असल्याचे सांगितले. तसेच ठसेतज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

2019 साली अमर नाईक याचा लोटली येथे भीषण अपघात झाला होता. त्यात तो बचावला होता. तेव्हापासून तर घरातच व्हिलचेअरवर होता. आता त्याच्यात सुधारणा होऊन तो चालण्या फिरण्याचा व्यायाम करुन आपल्या मित्रांना घेऊन गाडीतून फेरफटका मारून येत होता.

ती कार कोठून आणली?

या घटनेची माहिती मिळताच लोकांनी चिखलीच्या इस्पितळासमोर एकच गर्दी केली. पोलिसांनी कुट्टीकर याचा जबाब नोंदवून कार कुठून भाड्याने घेतली होती, त्याचा शोध घेत हल्लेखोरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला. मध्यरात्रीपर्यंत पोलिस संशयितांपर्यंत पोचू शकले नव्हते. चिखली इस्पितळात पोलिस अधीक्षक पंकज सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामात मार्गदर्शन केले. चिखली इस्पितळात जाऊनही त्यांनी माहिती घेतली. प्रथमदर्शनी गोळी वर्मी लागल्याने मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी आम्ही आणखीही माहिती संकलीत करत आहोत, असे त्यांनी इस्पितळातून निघताना सांगितले.

नव्या राज्यपालांच्या शपथविधीच्या दिवशीच दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात एकाचा जीव गेला. कायदा व सुव्यवस्था ढासळून गोव्याचे रूपांतर गुन्हेगारांच्या नंदनवनात झाले आहे. पोलिस महासंचालकांनी गोमंतकीयांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसाठी कठोर पावले टाकावीत.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते.

धागेदोरे हाती...

बोगमाळो येथील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. पोलिसांना या प्रकरणातील संशयितांसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. पोलिस त्या संशयितांचा माग काढत आहेत. संशयित रस्ता, हवाई किंवा रेल्वेमार्गे गोव्याबाहेर जाऊ नयेत, याची दक्षता घेण्यात येत आहे. घटना घडण्यापूर्वी तेथे तिसरी व्यक्ती उपस्थित होती का, याचीही खातरजमा करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com