Goa Power Supply: वीज ग्राहकांना दुहेरी पर्याय मिळणार; टाटा पॉवरची गोव्यात एंट्री निश्चित, कलम 14 मुळे मार्ग मोकळा

Tata Power Goa Distribution Licence: गोव्यातील वीज वितरण क्षेत्रात टाटा पॉवरच्या प्रवेशाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे.
 Tata Power Goa Distribution Licence
Goa Power SupplyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील वीज वितरण क्षेत्रात टाटा पॉवरच्या प्रवेशाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे. वीज कायदा २००३च्या या कलम १४ नुसार एकाच भौगोलिक क्षेत्रात वीज वितरण उपलब्ध असतानाही एका पेक्षा अधिक वीज वितरकांना परवाना देता येत असल्याने टाटा कंपनीला परवाना मिळणे केवळ औपचारिका राहिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाद नको म्हणून सरकार टाटाला परवाना देण्यात येणार नाही, असे सांगत असले तरी हा निर्णय सर्वस्वी वीज नियामक आयोगाकडे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अर्जदाराकडून काही मुद्द्यांवर अतिरिक्त माहिती आणि अनुपालन अहवाल मागविण्यात आला असून त्याची छाननी सुरू असल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

 Tata Power Goa Distribution Licence
इलेक्ट्रिशियनचे स्वप्न अधुरे; 'शॉक' लागून विद्यार्थी ठार, वीजजोडणीचे करत होता काम; म्हावळिंगेतील घटना

वीज कायदा, २००३ मधील कलम १४ नुसार एका भौगोलिक क्षेत्रात दोन किंवा अधिक वितरण परवानाधारकांना मंजुरी देण्याचा अधिकार नियामक आयोगाला आहे. आवश्यक आर्थिक क्षमता, पतक्षमता आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या अर्जदाराला केवळ त्या भागात आधीच एक वितरण परवानाधारक आहे. या कारणावरून परवाना नाकारता येत नाही, अशीही तरतूद कायद्यात आहे.

सूत्रांनी स्पष्ट केले की, मुंबईत अशा प्रकारची समांतर वितरण व्यवस्था यशस्वीपणे कार्यरत असून तेथे एकाच शहरात अनेक वितरण कंपन्या ग्राहकांना सेवा देतात. २०२५ मधील दुरुस्तीनंतर नवीन परवानाधारकाला स्वतंत्र वीजवाहिन्या आणि उपकेंद्रे उभारण्याची सक्तीही हटविण्यात आली आहे. त्याऐवजी विद्यमान वितरण जाळ्याचा नियमानुसार व्हीलिंग शुल्क भरून वापर करता येणार आहे.

 Tata Power Goa Distribution Licence
Goa Electricity Bill: गोव्यात वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! दंड आकारणीचा फटका; लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण

सार्वजनिक असो किंवा खासगी, प्रत्येक वितरण परवानाधारकावर सर्व पात्र ग्राहकांना भेदभाव न करता वीजपुरवठा करण्याची कायदेशीर जबाबदारी कायम राहील. ग्रामीण भाग, घरगुती ग्राहक तसेच राज्य सरकारच्या अनुदान योजनांवर या व्यवस्थेचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केल्याने गोव्यातील वीज वितरण क्षेत्रात स्पर्धेचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

पसंती ग्राहकाची; निर्णय बाकी

टाटा कंपनीचा हा प्रस्ताव राज्याच्या वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण किंवा वीज खात्याचा ताबा घेण्याचा नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उलट, विद्यमान सरकारी वीज खात्यासोबत समांतर वितरण परवानाधारक म्हणून टाटा पॉवरला काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे वीज ग्राहकांना दोन सेवा पुरवठादारांपैकी पसंतीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 Tata Power Goa Distribution Licence
Goa Electricity Meter: मुदत संपली! गोव्यात वीज खाते करणार धडक कारवाई; सोयीच्या ठिकाणी मीटर लावण्याचा विषय ऐरणीवर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा पॉवरला परवाना मंजूर झाला तरी गोवा वीज खाते हे विद्यमान वितरण परवानाधारक म्हणून पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. टाटा पॉवर समांतर परवानाधारक म्हणून सेवा देईल. त्यामुळे वीज ग्राहकांना कोणत्या कंपनीकडून वीज सेवा घ्यायची, याचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात असून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com