फातोर्डातील जलतरण तलाव निकामी झाल्याने जलतरणपटू निषेधाच्या तयारीत

गोवा क्रिडा प्राधिकरणाने जवाहरलाल नेहरु क्रिडा (Jawaharlal Nehru Stadium) संकुलात मल्टीपर्पज स्टेडियमबरोबरच, इनडोअर स्टेडियम व जलतरण तलाव (Swimming pool) बांधले होते.
Swimming pool in Jawaharlal Nehru Stadium
Swimming pool in Jawaharlal Nehru StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा - गोवा क्रिडा प्राधिकरणाने जवाहरलाल नेहरु क्रिडा (Jawaharlal Nehru Stadium) संकुलात मल्टीपर्पज स्टेडियमबरोबरच, इनडोअर स्टेडियम व जलतरण तलाव (Swimming pool) बांधले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉल व क्रिकेट स्पर्धांमुळे नेहरु स्टेडियम वेळोवेळी दुरुस्त केल्याने चांगल्या स्थितीत आहे. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या निमित्ताने इनडोअर स्टेडियमचीही दुरुस्ती झाली आहे. पण प्रश्र्न आहे तो जलतरण तलावाचा.

काही काळ जलतरण तलावाचा फायदा दक्षिण गोव्यातील लहान मुले, युवक, पालक याना झाला. या तलावात प्रशिक्षण शिबिरे, वर्ग, राज्य स्तरावरील स्पर्धा होत असे. पण गेल्या अनेक वर्षांपासुन या तलावाच्या एक व अनेक कटकटी सुरु झाल्या  गेल्या तीन वर्षांपासुन हा तलाव दुरुस्तीविना निकामी झाला आहे. कोविड महामारीमुळे तर या तलावात कोणिही फिरकत नाहीत त्यामुळे येथे नियुक्त केलेले प्रशिक्षक करतात काय हा प्रश्र्न सर्वांनाच पडलेला आहे.

Swimming pool in Jawaharlal Nehru Stadium
गोवा लसीकरणात अव्वल; मुख्यमंत्र्यांचा दावा

गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होणार की नाही या बद्दल साशंकता जरी असली तरी हा जलतरण तलाव लवकरात लवकर दुरुस्त करुन तो कार्यरत व्हावा या साठी गोवा स्विमिंग असोसिएशन आग्रही आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तलावाच्या दुरुस्तीसाठी गोवा क्रिडा प्राधिकरणासह संबंधीत खात्यांकडे विचारणा केली. फातोर्डेचे माजी आमदार दामू नाईक यांच्याकडेही हा प्रश्र्न उपस्थित केला.  पण त्यातुन काहीही निष्पन्न न झाल्याचे असोसिएशनचे सचिव सुदेश नागवेकर यानी या प्रतिनिधिला सांगितले.

या तलावाला तीन फिलट्रेशन प्लांट आहेत. त्यातील दोन प्लांट पाच वर्षांपुर्वीच नादुरुस्त झाले होते. ज्या एका प्लांटवर तलाव चालविला जात होता तो सुद्धा आता नादुरुस्त झाल्याचे नागवेकर यानी सांगितले. तत्पुर्वी 2000 सालीही फिलट्रेशन प्लांट बंद पडले होते. नंतर 2008 साली दहा लाख रुपये खर्च करुन फिलट्रेशन प्रक्रिया दुरुस्त करण्यात आली होती. 

Swimming pool in Jawaharlal Nehru Stadium
अखेर गोव्यातील सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकला

येथे केवळ फिल्ट्रेशन प्लांटचाच प्रश्र्न नसुन जलतरणपटूंच्या कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, प्लांट व मशिनरीच्या खोल्या, तलावातील पाईप लाईन दुरुस्त करण्याची, बदलण्याची आवश्यकता असल्याचे नागवेकर यांनी सांगितले. या कामासाठी 40 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार असुन काम कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराला हे काम पुर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. ही दोन वर्षें संपण्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे गोवा क्रिडा प्राधिकरणाने काम सुरु करण्याच्या सुचना कंत्राटदाराला देणे गरजेचे आहे असे नागवेकर यानी सांगितले. 

प्राधिकरणाकडुन अनेक कंत्राटदारांना 15 कोटी रुपये देणे बाकी आहे त्यामुळे 40 लाख रुपयांचा खर्च कठीण असल्याचे एका उच्च पदस्त अधिकाऱ्याने सांगितल्याचे नागवेकर म्हणाले. या नादुरुस्त तलावामुळे दक्षिण गोव्यातील जलतरणपटूंची कुचंबणा होत आहे. त्याना सराव करण्याची संधी मिळत नाही. जर तलावाचे काम ताबडतोब हातात घेतले नाही तर तलावाच्या संकुलात निषेध व्यक्त करण्याच्या विचारात जलतरणपटू व असोसिएशनचे पदाधिकारी आहेत असे नागवेकर यानी सांगितले.

गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्याअंतर्गत 23 कोटी रुपये खर्च करुन जलतरण तलावाची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव होता. पण जीएसटीमुळे खर्चाचा आक़डा कमी झाल्याने कंत्राटदाराने हे काम करण्यासच नकार दिल्याचे एका अधिकाऱ्याकडुन कळले.  हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्र्न उपस्थित झाला तेव्हा क्रिडा मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यानी पणजी व फातोर्डा तलावाचे काम हातात घेतले जाईल असे उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com